घरमुंबईमहापौर धमकी प्रकरणी मुंब्यातून एक ताब्यात

महापौर धमकी प्रकरणी मुंब्यातून एक ताब्यात

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांना मोबाईलवरून धमकावल्या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी तपासाबाबत गुप्तता बाळगली असून पोलिसांच्या टार्गेटवर आरोपी असल्याची चर्चा आहे. तर गुन्ह्यात वापरलेले ते मोबाईल सीमकार्ड हे मुंब्रा मधील एका इसमाच्या नावे असल्याचा खुलासा झाला आहे. एका इसमाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. तर महापौरांना धमकी देणार्‍या दाऊदच्या हस्तकाला गजाआड करा या मागणीसाठी महिला आघाडी आणि शिवसेना नगरसेविकांसह काही तृतीयपंथी पोलीस आयुक्तालयावर धडकल्या. त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले.

ठाणे पालिकेच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांना अज्ञाताने त्यांच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी दिली. कापूरबवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी धमकीचा फोन ज्या मोबाईल सीमकार्डवरून आला. तो मोबाईल ट्रेस करण्यात आला. तपासात हे मोबाईल सीम मुंब्रा परिसरात राहणार्‍या एका इसमाच्या नावाचे असल्याचे समोर आले. मात्र त्याचा गुन्ह्यात सहभाग नाही. दुसर्‍या माणसाच्या नावाने सीम कार्ड घेऊन महापौरांना धमकाविणारा आरोपी पोलिसांच्या रडारवर आहे. लवकरच त्याला अटक होईल, असा विश्वास कापूरबावडी पोलीस व्यक्त करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -