घरमुंबईसरकारी नोकऱ्यांसाठीच आरक्षणाची अट - राज ठाकरे

सरकारी नोकऱ्यांसाठीच आरक्षणाची अट – राज ठाकरे

Subscribe

पुण्यात मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा मोर्चावरुन सरकारवर केली टीका. आरक्षित उमेद्वारांना नोकऱ्यामिळत नाहीत तर महाराष्ट्रातील नोकऱ्या जातात कुठे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळाव्याचे पुणे येथे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारवर टीका केली. राज्यात फक्त सरकारी नोकऱ्यांसाठी आरक्षणाची गरज आहे. मात्र सरकारी नोकऱ्या कमी होत असल्याचे नेते म्हणतात. आरक्षित उमेद्वारांना नोकऱ्या मिळत नाहीत तर या नोकऱ्या जातात कुठे? आधिचे वा आताचे सरकार असो लोकांची दिशाभूल अजूनही केली जातेय. उद्योगधंद्यासाठी जगभरातील व्यापाऱ्यांची पहिली पसंती महाराष्ट्र आहे. मात्र येथील मुलांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे आरक्षणाचा मुद्दा उभा राहिला असल्याचे त्यांनी मेळाव्यात म्हटलं.

राज ठाकरे यांचे भाषण
८ नोव्हेंबर २०१६ रोजी सरकारने नोट बंदीची घोषणा केली तेव्हाच सरकारने राजकीय खड्डा खणायला सुरुवात केली. मराठा आंदोलनाचै कौतूक मी पूर्वीच्या भाषणांमध्ये केली. मागीलवर्षी निघालेला मराठा मोर्चा हा शांततेत निघाला होता. असा मोर्चा महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही निघाला नव्हता. राज्यातील मुलांना आर्थिक निकषांवर आरक्षण द्या. आगोदरचे सरकार किंवा आताचे सरकार लोकांच्या भावनांशी खेळतय. महाराष्ट्राची खरी परिस्थीती कोणीही सांगायला तयार नाही. सरकारी शिक्षण आणि नोकऱ्या मिळवण्यासाठी आपल्याला आरक्षणाची गरज आहे. मात्र खाजगी नोकऱ्यांमध्ये ही अट लागू पडत नाही. सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी असल्याचे न्याय व स्वबलीकरण खात्याचे मंत्री थावरसिंग गहेलोत यांनी सांगितले. आरक्षित जातीतील लोकांना नोकऱ्यामिळत नाहीत मग नेमक्या नोकऱ्या जातात तरी कुठे? उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात मात्र येथील नागरिकांना याची माहिती नाही. पहिला महाराष्ट्रातील लोकांची पोट भरु देत मग बाहेरच्या नागरिकांना नोकऱ्या द्या.
सरकारमध्ये असलेले मंत्री माराठा समाजाच्या मागण्यांवर फक्त राजकारण करतात. कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील विरोधी पक्षात असताना विधान भवनाच्या आवारात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र पद मिळाल्यावर आता आरक्षणावर एक शब्द ही काढत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -