घरमुंबईहिंदुजा रुग्णालयात ३५ वं अवयवदान, तिघांना जीवदान

हिंदुजा रुग्णालयात ३५ वं अवयवदान, तिघांना जीवदान

Subscribe

दरम्यान अवयवदान करणाऱ्या व्यक्तीचा एक किडनी हिंदुजा रुग्णालयात आणि दुसरी किडनी जसलोक रुग्णलयामध्ये दान करण्यात आली. तर त्यांचं यकृत ग्लोबल रुग्णालयात दान करण्यात आलं.

दिवसेंदिवस अवयवदानाच्या जनजागृतीमध्ये वाढ होते आहे. याच पार्श्वभूमीवर पी.डी.हिंदुजा रुग्णालयात पुन्हा एकदा अवयवदान करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे मुंबईतलं ३५ वं अवयवदान ठरलं आहे. एका ५९ वर्षीय व्यक्तीने केलेल्या अवयवदानामुळे तीन जणांना जीवदान मिळालं आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वी अवयवदान करणाऱ्या व्यक्तीला
ब्रेनस्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, मंगळवारी त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. त्यानंतर कुटुंबियांच्या परवानगीने या व्यक्तीची किडनी आणि यकृत हे दोन अवयव दान करण्यात आले. दरम्यान त्यांची एक किडनी हिंदुजा रुग्णालयातीलच एका व्यक्तीला आणि दुसरी किडनी जसलोक रुग्णलयामध्ये दान करण्यात आली. तर त्यांचं यकृत ग्लोबल रुग्णालयात दान करण्यात आलं. ही संपूर्ण माहिती हिंदुजा रुग्णालयाच्या उप संचालक डॉ. सुगंथी अय्यर यांनी दिली आहे. सध्या किडनी विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे, किडनीची जास्तीत जास्त काळजी घ्यावी असं आवाहनही डॉक्टर करत आहेत.

नुकतंच पार पडलं ३४ वं अवयवदान

दरम्यान नुकतंच मुंबईमध्ये ३४ वं अवयवदान पार पडलं होतं. जोधपूरच्या ६१ वर्षीय महिलेने केलेल्या अवयवदानामुळे मुंबईतील एका व्यक्तीला जीवदान मिळालं. जोधपूरहून आलेल्या एका महिलेवर पी.डी. हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना २७ तारखेला अचानक ब्रेनस्ट्रोक झाल्यामुळे आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. महिलेच्या कुटुंबियांचं समुपदेशन केल्यानंतर नातेवाईंकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या महिलेचे यकृत दान करण्यात आलं. माहिमच्या पी.डी हिंदुजा रूग्णालयात अवयवदान करण्यात आलेल्या या अवयवदानामुळे एका व्यक्तीला नव जीवन मिळालं.

पाहा Video : राधिका आपटे सांगतेय ‘अवयवदानाचं’ महत्व

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -