घरक्रीडारवी शास्त्रीकडून भारतीय संघाची पाठराखण

रवी शास्त्रीकडून भारतीय संघाची पाठराखण

Subscribe

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाची मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पाठराखण केली आहे. शास्त्रींच्या मते आताच्या भारतीय संघाने मागील १५-२० वर्षातील अन्य भारतीय संघांच्या तुलनेत परदेशात खूप चांगली कामगिरी केली आहे .

इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेली कसोटी मालिका भारताने ३-१ अशी गमावली आहे. पण भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यामते जर भारताने मोक्याच्या क्षणी चांगला खेळ केला असता तर कदाचित या मालिकेत भारताकडे ३-१ अशी आघाडी असती.
तसेच शास्त्रींच्या मते भारताने ही मालिका जरी गमावली असली विराट कोहलीच्या संघाने परदेशात जी कामगिरी केली आहे ती १५-२० वर्षांतील अन्य भारतीय संघांच्या तुलनेत खूप चांगली आहे.

कमी काळात चांगले प्रदर्शन

शास्त्री भारतीय संघाबाबत म्हणाले,” आमच्या संघाने सामना जिंकण्याचे खूप प्रयत्न केले पण इंग्लंडचा संघ आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे होता. मागच्या तीन वर्षात भारतीय संघाने परदेशात जाऊन नऊ कसोटी सामने जिंकला आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध मिळून तीन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मागच्या १५-२० वर्षांत अन्य कुठल्याही भारतीय संघाने इतक्यात कमी काळात इतकी चांगली कामगिरी करुन दाखवली नव्हती. त्यावेळच्या संघात प्रतिभावंत खेळाडू असून सुद्धा अशी कामगिरी करणे भारताला शक्य झाले नव्हते. सध्या संघात चांगले खेळाडू आहे पण सामने जिंकण्यासाठी त्यांना मासिकतेदृष्ट्या आणखी खणखर होणे आवश्यक आहे.”

अंतिम सामन्यात पूर्ण टक्कर देऊ 

“आमच्या संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्याचे पूर्ण प्रयत्न केले. आम्ही जर आणखी चांगले खेळलो असतो तर आमच्याकडे ३-१ ची आघाडी असती. ही गोष्ट भारतीय खेळाडूंना माहित आहे आणि याचे त्यांना वाईटही वाटत आहे. या मालिकेचा शेवटचा सामना जिंकून आम्हला हा दौरा संपवायचा आहे,” असेही शास्त्री म्हणाले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -