घरमुंबईपंढरीनाथ सावंत यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार

पंढरीनाथ सावंत यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार

Subscribe

पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा २०१८ या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार जाहीर करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्य शासनामार्फत पत्रकार, छायाचित्रकार आदींना देण्यात येणार्‍या इतर विविध पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.

शनिवार, २७ जुलै रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी ४ वाजता होणार्‍या समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या समारंभात २०१६ आणि २०१७ या सालातील पत्रकारिता पुरस्कारांचे तसेच ‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’ लघुचित्रपट स्पर्धा २०१६ आणि ‘महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा’ २०१७ आणि २०१८ यातील विजेत्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. २०१८च्या पुरस्कारात बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) हरी रामकृष्ण तुगांवकर, दै. सकाळ, बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) दिनेश गणपतराव मुडे, दै. लोकमत समाचार, मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) मोहम्मद नकी मोहम्मद तकी, दै. वरक – ए – ताजा, पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) महेश घनश्याम तिवारी, न्यूज 18 लोकमत, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) प्रशांत सोमनाथ खरोटे, दै. लोकमत, सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) अनिकेत बाळकृष्ण कोनकर, www.bytesofindia.com, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) प्रवीण श्रीराम लोणकर, दै. महाराष्ट्र टाईम्स, आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग संजय कृष्णा बापट, दै. लोकसत्ता, नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग मोहन मारूती मस्कर – पाटील, दै. पुण्यनगरी, शि.म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग भगवान आत्माराम मंडलिक, दै. लोकसत्ता, ग.गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग – श्रीमती इंदुमती गणेश (सूर्यवंशी), दै. लोकमत, लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग गोपाल जगन्नाथराव हागे, दै. सकाळ ग्रोवन, ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग योगेश प्रकाश पांडे, दै. लोकमत, तर माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) हा मंत्रालयातील विभागीय संपर्क अधिकारी डॉ. सुरेखा मधुकर मुळे यांना जाहीर करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -