घरमुंबईवाझेंच्या पुनर्नियुक्तीसाठी ठाकरे सरकारचा दबाव?

वाझेंच्या पुनर्नियुक्तीसाठी ठाकरे सरकारचा दबाव?

Subscribe

परमबीर सिंह यांचा यांचा खळबळजनक आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अंमलबजावणी संचलनालया (ईडी)ला दिलेल्या जबाबात केल्याचे समजत आहे. सचिन वाझेला सेनेत घेतल्यानंतर त्याला गुन्हे शाखेत महत्वाच्या पदावर नियुक्ती द्या असेही आपल्याला सांगण्यात आले होते, अशी माहितीही परमबीर सिंह यांनी ईडीला दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला होता. यावेळी ईडीच्या अधिकार्‍यांनी सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात रुजू करण्याबाबतचा प्रश्न परमबीर सिंह यांना विचारला होता. त्याला उत्तर देताना परमबीर सिंह यांनी अनेक खळबळजनक दावे केले. सचिन वाझे याला जून 2020 मध्ये पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत रुजू करुन घेण्याच्या निर्णयासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि काही अधिकारी होते. हे सर्वजण संबंधित समितीचे सदस्य होते. यावेळी सचिन वाझेच्या नियुक्तीसाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची थेट सूचना होती, असा दावाही परमबीर सिंह यांनी ईडीकडे केला.

- Advertisement -

बदलींची यादी
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादी अनेकदा देण्यात आली होती. ही यादी गृहमंत्रालयात तयार करण्यात आली होती. ही यादी गृहमंत्री अनिल देशमुख, त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हटकर यांच्याकडूनही देण्यात आल्याचा दावा परमबीर सिंह यांनी केला. मात्र या यादीची कोणतीही नोंद नसल्याचेही त्यांनी म्हटले. मुंबई पोलीस दलात बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त असतात. या समितीमध्ये पीएसआय ते डीसीपी दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो.

यादी अनिल परबांकडूनच
पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा अनिल देशमुखांचा जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदवण्यात आला आहे. मला कुठल्याही व्यक्तीने यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती , असे अनिल देशमुख यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे.

- Advertisement -

तर याबाबात कुठलीही माहिती आमच्याकडे नाहीत हे प्रकरण तपासून बघावे लागेल, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -