घरमुंबईसोसायटीतील रिकाम्या वाहनतळांच्या जागी करता येणार पार्किंग

सोसायटीतील रिकाम्या वाहनतळांच्या जागी करता येणार पार्किंग

Subscribe

खाजगी निवासी इमारतींच्या उत्पन्नाकरिता अभिनव पर्याय होणार उपलब्ध

मुंबईतील लोकसंख्या दिवसें-दिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे परिणामी वाहनांची संख्या देखील वाढत आहे. वाढत्या वाहनांच्या संख्या लक्षात घेऊन मुंबईमध्ये वाहनं पार्किंगची गैरसोय निर्माण झाली आहे. यालाच पर्यांयी व्यवस्था म्हणून खाजगी निवासी इमारतींच्या उत्पन्नाकरिता अभिनव पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी निवासी सोसायट्यांच्या वाहनतळांमधील अनेक पार्किंग स्पेस दिवसा रिकाम्या असतात त्यावेळी या परिसरात बाहेरून येणाऱ्या गाड्यांना अनेकदा जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकदा जागा पार्किंगकरिता जागा नसल्याने या गाड्या रस्त्यावरच पार्क केल्याचे दिसते. यामुळे वाहन चालकास किंवा मालकास याचा दंड देखील भरावा लागतो. याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे एक अभिनव उपक्रम उपलब्ध होणार आहे.

असा असेल हा अभिनव पर्याय

खाजगी निवासी इमारती तसेच सोसायट्यांमध्ये असणाऱ्या वाहनतळांच्या ज्या जागा दिवसा रिकाम्या असणार आहेत, त्या ठिकाणी बाहेरील गाड्या उभ्या करता येणार असून ही सेवा सशुल्क असणार आहे. यामुळे खाजगी वाहनांना अतिरिक्त वाहनतळ उपलब्ध होणार आहे. यासोबतच सोसायट्यांना देखील उत्पन्नाचा एक अभिनव पर्याय उपलब्ध होणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई वाहनतळ प्राधिकरण यांच्याद्वारे खाजगी निवासी इमारती तसेच सोसायट्यांमधील वाहनतळाच्या दिवसा रिकाम्या असणाऱ्या जागेत पार्किंग पूल तयार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

उत्पन्नाचा एक अभिनव मार्ग होणार खुला 

यामध्ये इच्छुक असणाऱ्या सोसायट्यांना त्यांचे वाहनतळ तसेच मोकळी जागा ही खाजगी वाहनांना भाड्याने देता येणार आहे. यामुळे खाजगी सोसा. तसेच इमारतींना उत्पन्नाचा एक अभिनव मार्ग खुला होणार आहे. यामुळे गरजू वाहन चालकांसह मालकांना वाहनतळ शोधणे सोपे होणार आहे.


हेही वाचा – आरेतील वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -