घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेलने पुन्हा खाल्ला भाव

पेट्रोल-डिझेलने पुन्हा खाल्ला भाव

Subscribe

सलग १५ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जनतेच्या खिशाला आणखी फटका बसला आहे.

महागाईमुळे आधीच जनता त्रस्त झाली आहे त्यामध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात साततल्याने वाढ होत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात १२ पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये ११ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमधील पेट्रोलचा आजचा दर ८७.८९ प्रतिलिटर तर डिझेल ७७.०९ प्रतिलिटर झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला आणखी फटका बसला आहे.

- Advertisement -

सलग १५ व्या दिवशी वाढ

दिल्लीमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल १२ पैसे तर डिझेल १० पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. त्यामुळे आजचा पेट्रोलचा दर ८०.५० रुपये आणि डिझेलचा दर ७२.६१ रु. प्रतिलिटर आहे. शनिवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली होती आणि आता लगेच दुसऱ्या दिवशी वाढ झाल्यामुळे जनता संतप्त झाली आहे. सलग १५ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्य दरामध्ये वाढ सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -