घरमुंबईलुप्त झालेल्या फुलपाखरांचे चित्रप्रदर्शन

लुप्त झालेल्या फुलपाखरांचे चित्रप्रदर्शन

Subscribe

राणीबागेत वन्यजीव सप्ताह

भारतातून लुप्त झालेल्या फुलपाखरांचे तसेच काही विशिष्ट ठिकाणी दिसणार्‍या फुलपाखरांचे चित्र प्रदर्शन राणीबागेत भरवण्यात आले आहे. जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याला विद्यार्थी आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वन्यजीव चित्रकार परेश चुरी यांनी सांगितले. जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय येथे ब्रिथिंग रूट्स या संस्थेद्वारे 2 ते 7 ऑक्टोबर दरम्यान हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

सिक्कीम, मेघालय, नागालँड, उत्तराखंड, काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, अंदमान, निलगिरी या ठिकाणी असलेल्या फुलपाखरांच्या आळ्यांचे खाद्य, फुलपाखरे मधप्राशन करताना त्यांचा करण्यात आलेला अभ्यास, परजिवी किटक याचे गेल्या 11 वर्षात डॉक्युमेंटेशन करण्यात आले आहे. त्याचा वापर या प्रदर्शनावेळी करण्यात आला असल्याचे परेश चुरी यांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. भायखळा येथील राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय येथे 2 ते 7 ऑक्टोबर दरम्यान हा सप्ताह साजरा केला जात आहे.

- Advertisement -

या सप्ताहानिमित्त यावर्षी बिग कॅट्स प्रिडेटर अंडर थ्रेट, मांजरीच्या प्रवर्गातील वाघ, सिंह, चित्ता, बिबळ्या यामोठ्या प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे या प्राण्यांबाबत जागरूकता करता यावी म्हणून एका सादरीकरण तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे या प्राण्यांची माहिती देण्यात येत आहे. तसेच भारतातील फुलपाखरे या विषयावर चित्रप्रदर्शन आयोजित करून जनजागृती केली जात असल्याचे शिक्षण व जनसंपर्क अधिकारी अनिल परांजपे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -