घरमुंबईमुंबईतील 'याच' हॉटेलमध्ये सचिन वाझे राहत होता बनावट आधारकार्डवर, इथेच रचला कट

मुंबईतील ‘याच’ हॉटेलमध्ये सचिन वाझे राहत होता बनावट आधारकार्डवर, इथेच रचला कट

Subscribe

हॉटेलमध्ये राहण्यासाठी वाझेंनी वापरले बनावट आधारकार्ड

देशातील एक नंबरचे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याबाहेर अवैध स्फोटकं सापडली होती. यामध्ये सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असून एनआयए या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सचिन वाझेंना अटक केल्यापासून एनआयएच्या तपासाला गती मिळाली आहे. सचिन वाझेंच्या प्रकरणात तपास सुरु असताना अनेक धक्कादायक माहिती मिळवण्यात एनआयए यशस्वी झाली आहे. आता पुन्हा एनआयएला सचिन वाझे स्फोटक प्रकरणात मोठी माहिती मिळाली आहे. ती अशी की, अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचा कट हा मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये रचण्यात आला होता. याच हॉटेलमध्ये सचिन वाझे बनावट आधारकार्ड करुन राहत होते.

एनआयएचे पथक अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात तपास करत आहे. यामध्ये मुख्य आरोपी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे ज्या ठिकाणी राहत होते. त्या ठिकाणी एनआयए अधिक माहितीसाठी चौकशी करत आहे. यामध्ये सचिन वाझे यांनी मुकेश अंबांनी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट मुंबईतील प्रसिद्ध आणि अलिशान अशा ट्रायडंट हॉटेलमध्ये रचला असल्याची माहिती मिळते आहे. सचिन वाझे १६ फेब्रुवारी पासून ते २० फेब्रुवारीपर्यंत ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत होते अशी माहिती एनआयएच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनआयएच्या पथकाने हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी केली आहे. तसेच हॉटेलमध्ये एनआयएची टीम तपासासाठी पोहचली होती.

- Advertisement -

एनआयएने ट्रायडंट हॉटेलमध्ये केलेल्या तपासात पुढील माहिती प्राप्त झाली आहे. सचिन वाझे इनोव्हा गाडीतून हॉटेलमध्ये आले. हॉटेलमध्ये येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. यानंतर २० फेब्रुवारी रोजी सचिन वाझे प्राडो गाडीतून हॉटेलबाहेर गेले तसेच दोन मोठ्या बॅगा हॉटेलमध्ये घेऊन जाताना सचिन वाझे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. परंतु या सर्वात धक्कादायक माहिती अशी मिळाली आहे की, सचिन वाझे हे ट्रायडेंट हॉटेलमध्ये बनावट आधारकार्डचा वापर करुन राहत होते. हॉटेलमध्ये वाझे यांनी दुसऱ्याच्या नावाचे आधारकार्ड वापरले परंतु त्या आधार कार्डवर फोटो वाझेंनी स्वतःचा लावला होता. अशी माहिती एनआयएने केलेल्या तपासात प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुढील तापासात एनआयएला कोणती माहिती मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -