घरमुंबईकेक आणि बिर्याणी खाऊन 25 जणांना विषबाधा

केक आणि बिर्याणी खाऊन 25 जणांना विषबाधा

Subscribe

वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या केक आणि बिर्याणी खाऊन 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. एकाच वेळेस 25 जणांना उलट्या होऊ लागल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. यासर्वांना जवळच्या शताब्दी आणि भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केक, बिर्याणी आणि पाण्याचे नमूने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

दहिसर येथील कांदरपाडा, रमाकांत कंपाऊंडमध्ये अर्जुन सिंग हे राहत असून मंगळवारी त्यांची मुलगी आराध्या हिचा वाढदिवस होता. त्यासाठी त्याने घरात बिर्याणी बनविली होती तर मानव केक शॉपमधून एक केक ऑर्डर केला होता. तो केक आणि बिर्याणी ज्यांनी खाल्ली त्यापैकी काहीजणांना दुसर्‍या दिवशी दुपारी उलट्या होणे, चक्कर येणे आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर परिसरातील इतरांना अशाच प्रकारे त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने शताब्दी आणि भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

एकाच वेळेस 25 हून अधिक लोकांना केक आणि बिर्याणी खाऊन विषबाधा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या सर्वांवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले. आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह महानगरपालिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली होती. वाढदिवसानिमित्त केक आणि पाणी बाहेरुन मागविण्यात आले होते तर बिर्याणी घरात बनविण्यात आली होती. त्यामुळे या तिघांचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -