घरमुंबईपोलिसांनी साजरा केला गुंडाचा वाढदिवस; दोन अधिकाऱ्यांसह पाच जण निलंबित

पोलिसांनी साजरा केला गुंडाचा वाढदिवस; दोन अधिकाऱ्यांसह पाच जण निलंबित

Subscribe

पोलीस ठाण्यात गुंडाचा वाढदिवस साजरा केल्यामुळे पोलिसांना हे महागात पडले आहे. याप्रकरणात दोन अधिकाऱ्यांसह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.

भांडुप पोलीस ठाण्यात एका गुंडाचा वाढदिवस साजरा करणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. या पाचही जणांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. २२ जुलै रोजी स्थानिक गुंड अयान खान उर्फ उल्ला याचा वाढदिवस भांडुप पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये केक कापून साजरा करण्यात आला होता.

यावेळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी अयान खान याला केक भरवतानाचे फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्रयत्न देखील करण्यात आले होते.

- Advertisement -

मात्र या व्हिडिओची दखल थेट मुंबई पोलिस दलाचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय चौबे यांनी घेऊन काही दिवसांपूर्वीच चौकशीचे आदेश परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांना दिले होते.
व्हिडिओ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पंकज शेवाळे, सचिन कोकरे, पोलीस हवालदार घोसाळकर, जुमले आणि गायकवाड याच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच पाचही जणांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

Viral video – मुंबई पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये साजरा केला गुंडाचा वाढदिवस

Viral video – मुंबई पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये साजरा केला गुंडाचा वाढदिवस

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜುಲೈ 31, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -