घरमहाराष्ट्रनाशिकअहिंसा परमो धर्म: तिकिटावर नाशिकची मोहोर

अहिंसा परमो धर्म: तिकिटावर नाशिकची मोहोर

Subscribe

भारतीय डाकसेवेतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत नाशिकच्या दंडगव्हाळ यांचे चित्र १५ रुपयांच्या टपाल तिकिटावर

भारतीय डाकसेवेतर्फे राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या अहिंसा परमो धर्म: या विषयावरील चित्र स्पर्धेत नाशिकची मोहोर उमटली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ९ हजार स्पर्धकांमधून नाशिकचे चित्रकार रवी सोमनाथ दंडगव्हाळ यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांचे अहिंसा परमो धर्म: हे चित्र १५ रुपयांच्या तिकिटावर झळकल्याने नाशिकच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मंगळवारी (ता.३०) नाशिक पोस्ट ऑफीस (जीपीओ) येथे रवी दंडगव्हाळ यांचा सन्मान करत तिकिटाचे अनावरण करण्यात आले.

देशभर यावर्षी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. भारतीय डाकसेवेतर्फे महात्मा गांधी यांच्या अहिंसा परमो धर्म: या विषयावर राष्ट्रीय स्तरावर चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रवी दंडगव्हाळ यांनी ९ हजार चित्रांमध्ये वेगळेपण सिद्ध केले. त्यांनी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला. ते १९९८ पासून अ‍ॅक्रेलिक माध्यमात काम करीत आहेत. त्यांना अद्यापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक, आर्ट टुडे गॅलरी पुणे, आर्ट प्लाझा मुंबई, बिरला कला व संस्कृती अकादमी कोलकता, वैश्विक आर्ट गॅल

- Advertisement -
अहिंसा परमो धर्म: तिकिटावर नाशिकची मोहोर

री पुणे, केरळ ललित कला अ‍ॅकॅदमी, गोवा कला अकादमी, ठाणे कला भवन या ठिकाणी झाली आहे.

असे आहे चित्र

  • अहिंसा परमो धर्म: हा भारतीय तत्वातील महत्वाचा विचार
  • जैन तत्वातील गाय व सिंह हि प्रतीके
  • सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळे
  • शांततेचे प्रतिक म्हणून कबुतर
  • गांधीजींच्या कर्माचे प्रतिक म्हणून त्यांचा हातात काठी असलेले चित्र
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -