घरमुंबईमैदान बुकिंगसाठी राजकीय पक्षांची धावाधाव

मैदान बुकिंगसाठी राजकीय पक्षांची धावाधाव

Subscribe

कल्याणात मैदानांच्या बुकिंगसाठी राजकीय पक्षांची धावाधाव सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कल्याणातील यशवंतराव चव्हाण क्रिडांगण आणि वासुदेव बळवंत फडके मैदान हे दोन्ही मैदान तीन-तीन दिवसांसाठी बुकिंग करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार घोषित केले जात आहेत. मात्र उमेदवारांनी अजूनही उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाही. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचाराच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. पण कल्याणात मैदानांच्या बुकिंगसाठी राजकीय पक्षांची धावाधाव सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कल्याणातील यशवंतराव चव्हाण क्रिडांगण आणि वासुदेव बळवंत फडके मैदान हे दोन्ही मैदान तीन-तीन दिवसांसाठी बुकिंग करण्यात आले आहेत.

मैदान बुकिंगसाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण आणि भिवंडी या दोन लोकसभा मतदार संघाचा परिसर येतो. या दोन्ही मतदार संघाच्या निवडणूका रविवार २९ एप्रिल रोजी होत आहे. युती आणि आघाडीने आपआपले उमेदवार घोषीत केले असले तरी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झालेली नाही. मात्र त्यापूर्वीच कल्याण डोंबिवलीतील मैदान बुकिंग करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचे दिसून येते. महापालिका क्षेत्रात एकूण १५ मैदाने आहेत. कल्याणातील यशवंतराव चव्हाण क्रिडांगण आणि वासुदेव बळवंत फडके मैदान हे दोन्ही मैदान तीन- तीन दिवसासाठी बुकिंग करण्यात आले आहे. मैदानाचे बुकिंग करताना पालिकेने आचारसंहिता पाळण्याचे आणि ध्वनीप्रदूषण होणार नाही. यासंदर्भात सुचना केल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान आणि कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड मैदान जाहिरसभांसाठी उपलब्ध आहेत. मात्र कल्याणातील सुभाष मैदान आणि डोंबिवलीतील हभप वासुदेव महाराज म्हात्रे क्रिडासंकूल आणि नेहरू मैदान या तीन मैदानांवर प्रचारसभा घेण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात येणार नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या तारखा अजूनही निश्चित झाल्या नसल्या तरी मैदान आरक्षणासाठी सर्वच राजकीय पक्षांची गडबड सुरू झाल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -