घरCORONA UPDATECorona: एम-पूर्व विभागातील पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतू लागले

Corona: एम-पूर्व विभागातील पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतू लागले

Subscribe

गोवंडी, मानखुर्द या एम-पूर्व या विभागात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत जात असून आतापर्यंत या विभागातील ७ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.

गोवंडी, मानखुर्द या एम-पूर्व या विभागात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत जात असून आतापर्यंत या विभागातील ७ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. मात्र आतापर्यंत एकता नगर, टाटा कॉलनी तसेच शिवाजीनगर आदी भागांमध्येच सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

एम-पूर्व विभागापर्यंत १०० च्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांमुळे या संपूर्ण विभागात आतापर्यंत ३० क्षेत्र बाधित झाले आहेत. त्यातील चिता कॅम्प, टाटा कॉलनीसह आसपासच्या भागातील आतापर्यंत ७ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होवून घरी परतले असल्याचे एम-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधांशु द्विवेदी यांनी स्पष्ट केले. झोपडपट्टी वस्ती असलेल्या या विभागातून रुग्ण बरे होवून घरी परतणे ही सर्वात समाधानाची बाब मानली जात आहे. एम-पूर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपली भूमिका चोख पार पाडत आहे. हा विभाग बहुतांशी झोपडपट्टी परिसर आहे. अत्यंत दाटीवाटीने पसरलेल्या या विभागात धारावीप्रमाणे चिता कॅम्प हा झोपडपट्टीचा विभाग आहे.

- Advertisement -

एम-पूर्व प्रभागाच्या अध्यक्षा वैशाली नवीन शेवाळे यांनी या विभागात महापालिकेच्या केईए तसेच शीव रुग्णालयांतील पथकांमार्फत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे. शिवाय खासगी डॉक्टरांची पथके घरोघरी जावून रुग्णांचा शोध घेत आहे. तसेच प्रत्येक विभागात महापालिका, नगरसेवकांच्या माध्यमातून निजंर्तुकीकरण केले जाते. परंतु हा विभाग दाटीवाटीचा असल्याने तसेच एकेका खोलीमध्ये दहा ते बारा लोक राहत असल्यामुळे पोलिसांची पाठ वळताच रस्त्यांवर उतरतात. परंतू प्रशासन या विभागात उत्तम काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –

तरुणाच्या तोंडात केली सॅनिटायझरची फवारणी; उपचारादरम्यान मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -