घरमुंबईप्रकाश आंबेडकरांना आघाडीत यायचेच नव्हते

प्रकाश आंबेडकरांना आघाडीत यायचेच नव्हते

Subscribe

लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात 48 पैकी 48 जागी उमेदवार उभे केलेले आहेत. मात्र जे उमेदवार वंचित बहुजन आघाडीने उभे केले आहेत, ते केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार यांचा पराभव व्हावा किंवा या आघाडीचे मते कमी व्हावीत, यासाठी उभे करण्यात आले. काँग्रेसने प्रकाश आंबेडकरसोबत आघाडीसाठी सातत्याने प्रयत्न केला परंतु त्यांना आघाडी करायचीच नव्हती, त्यांची भूमिका कायम संशयास्पद होती, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी शुक्रवारी मुंबईत केला.

वंचित बहुजन आघाडीच्या 48 उमेदवारांमधून केवळ प्रकाश आंबेडकर सोडले तर कुणीही निवडून येणार नाही. दलित मते ही केवळ प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या पाठिशी नाहीत, अनेक दलित संघटना आहेत, त्यांचीही मते आहेत. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या राजकीय भूमिका निर्णायक वळणावर आल्यावर निषेधार्ह वाटत आहे, असेही मुणगेकर म्हणाले. रामदास आठवले हे भाजपसमोर फक्त गयावया करून भीक मागून राज्यसभा आणि मग मंत्रीपद मिळवतात. त्यांच्यात निष्ठा उरलेली नाही. रामदास आठवले पुण्यात म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी केलेली नोटाबंदी ही डॉ. आंबेडकर यांचा ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजीयन्स, इटस सोल्युशन’ हा ग्रंथ वाचून केली.

- Advertisement -

त्यांच्याइतका मोठा विनोद कुणाचाच नाही. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांची भूमिका अमान्य असलेला मोठा दलित गट समाजात आहे आणि त्याचा पाठिंबा काँग्रेसला होईल, असे मत यावेळी मुणगेकरांनी व्यक्त केले. तसेच बाबासाहेबांच्या रक्ताला निवडून द्या, असा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र कोणाला निवडून द्यायचे हे सूज्ञ आंबेडकरी जनतेला कळते, असेही मुणगेकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -