घरमुंबईभिवंडीत शाळेच्या बसला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

भिवंडीत शाळेच्या बसला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Subscribe

भिवंडीत शाळेच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेत सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. मात्र या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबईत सतत आगीच्या घटना घडत असताना आज पुन्हा एकदा भिवंडीत आग लागल्याची घटना घडली आहे. भिवंडी वाडा रोडवरील म्हाडा कॉलनी इथे उभ्या असलेल्या खाजगी शाळेच्या बसला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या बसमध्ये कोणतीही व्यक्ती नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आग लागल्याची घटना समजताच घटनास्थळी अग्निशमनच्या गाड्या दाखल होऊन अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -