घरमनोरंजनहे असतील 'बिग बॉस १३' चे स्पर्धक

हे असतील ‘बिग बॉस १३’ चे स्पर्धक

Subscribe

दरवर्षी प्रमाणे प्रत्येक सिजनसारखे या सिजनमध्ये ही स्पर्धकांबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे.

बिग बॉस १३ लवकरच सुरू होणार असून तशी जोरदार तयारी ही सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे प्रत्येक सिजनसारखे या सिजनमध्ये ही स्पर्धकांबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. एकीकडे सलमानची हिरोईन जरीन खानच्या शोमध्ये सहभागी होण्याची चर्चा सुरू आहे. यासोबतच करण पटेलचे नाव या शोच्या स्पर्धक यादीमध्ये घेतले जात आहे. या शोमध्ये सहभागी असणाऱ्या स्पर्धकांच्या यादीतील खालील नावे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंकिता लोखंडे

टेलिव्हिजन इंडस्ट्रीनंतर बॉलिवूड क्षेत्रात आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेचे नाव बिग बॉसचा भाग असल्याची चर्चा सुरू आहे. मणिकर्णिका: द क्वीन ऑफ़ झाँसी या चित्रपटातून अंकिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसली होती.

- Advertisement -

देवोलीना भट्टाचार्जी

छोट्या पडद्यावर अभिनय करणारी अभिनेत्री देवोलीना सलमानच्या शोमध्ये पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळू शकते.

- Advertisement -

जरीन खान

जरीन खान 1921या चित्रपटात शेवटची प्रेक्षकांना बघायला मिळाली होती. या अभिनेत्रीला या शोच्या निर्मात्यांनी शोमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते.

नवजोत गुरुदत्त

या काही स्पर्धकांच्या नावासोबत नवजोतही सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

रणविजय सिंहा

या शोबद्दल अनेक अफवांना उधाण आले असताना छोट्या पडद्यावरील रणविजय सिंहला या शोसाठी संपर्क केला होता. परंतु या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विवेक दहिया

दिव्यांका त्रिपाठीचा पती विवेक दहिया हे देखील सहभागी होण्याची चर्चा बिग बॉस चाहत्यामध्ये होताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -