घरमुंबईगुडविन ज्वेलर्सच्या मालकाच्या प्रॉपर्टी सील!

गुडविन ज्वेलर्सच्या मालकाच्या प्रॉपर्टी सील!

Subscribe

गुडवीन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि सुदीशकुमार या दोघा भावांच्या मालमता पोलिसांनी सील केल्या आहेत.

जादा पैशाचे आमिष दाखवून ग्राहकांना कोट्यवधी रूपयांना चुना लावून पळ काढणारे गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि सुदीशकुमार या दोघा भावांच्या मालमता पोलिसांनी सील केल्या आहेत. तसेच त्याचे बँक खाती गोठवून गाड्याही जप्त करण्याची कारवाई केली आहे. मात्र फसवणूक झालेले ग्राहक पुढे येत असल्याने फसवणुकीची किंमत वाढत आहे.

फ्लॅट आणि मर्सिडीज गाडी जप्त

डोंबिवलीत गुडविन ज्वलेर्स अनेक दिवसांपासून बंद असल्याच्या कारणावरून ग्राहकांनी ज्वेलर्ससमोर गर्दी करायला सुरूवात केली. त्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. सुरूवातीला डोंबिवलीतील ६९ जणांनी पुढे येत ३ कोटी रूपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुडविन विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुडविन ज्वलेर्सची विविध शहरात एकूण १३ दुकाने आहेत. ही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली असून फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या आणि फसवणुकीचा आकडा वाढल्याने हा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आतापर्यंत डोंबिवली, अंबरनाथ आणि ठाणे या तीन शहरात एकूण २६१ ग्राहकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यांची सुमारे ९ कोटीच्या आसपास रक्कम होत आहे. गुडविनची १३ दुकाने बंद करून मालक सुनीलकुमार आणि सुदीशकुमार यांनी पळ काढला आहे. डोंबिवलीतील पलावा येथे हे दोघेही राहतात. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून त्यांचे दोन्ही फ्लॅट आणि मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. घरात आणि दुकानात छापा टाकल्यानंतर काही कागदपत्रं पोलिसांना मिळाली आहेत. त्यानुसार पोलिसांनी बँक खातीही गोठवली आहेत. मात्र दोघाही भावांचा तपास लावण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही.

- Advertisement -

पोलिसांकडून पंचनामा सुरू

हजारो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा लावून पसार झालेल्या गुडविन ज्वेलर्सचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविल्यानंतर या तपासाला वेग आला आहे. शुक्रवारी दुपारी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सच्या दुकानाचे सील तोडून पंचनामा करण्यास सुरूवात केली आहे. ही माहिती मिळताच गुंतवणूकदारांनी दुकानाबाहेर तोबा गर्दी केली होती. कालच गुडविनचे मालक सुनील कुमार आणि सुदीश कुमार यांची मर्सिडीज गाडी पोलिसांनी जप्त केली असून ती डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दुकानात काय सापडतय? याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष वेधलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -