घरमुंबईटिटवाळा स्थानकावर रेलरोको; स्थानिक उतरले ट्रॅकवर!

टिटवाळा स्थानकावर रेलरोको; स्थानिक उतरले ट्रॅकवर!

Subscribe

मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकावर स्थानिकांनी वनविभागाच्या कारवाईच्या विरोधात रेलरोको केला. शुक्रवारी पानवली गावातल्या अनधिकृत बांधकामाविरोधात वनविभागाने कारवाई केली होती.

मध्य रेल्वेवरच्या टिटवाळा रेल्वे स्थानकावर स्थानिकांनी अचानक रेलरोको केला. त्यामुळे रविवारी मेगाब्लॉकमुळे आधीच त्रासलेल्या मुंबईकरांना अधिकच त्रासाचा सामना करावा लागला. टिटवाळ्यामध्ये शुक्रवारी अनधिकृत बांधकामांविरोधात स्थानिक वनविभागाच्या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईमध्ये तब्बल ४०० अनधिकृत घरांवर हातोडा चालवण्यात आला होता. मात्र, या कारवाईला स्थानिकांचा तीव्र विरोध होता. त्या पार्श्वभूमीवर या कारवाईचा निषेध करण्यासाठी स्थानिकांनी थेट टिटवाळा स्टेशनवर जाऊन रेलरोको केला. रेल्वे ट्रॅकला लागूनच असलेल्या पानवली गावामध्ये वनविभागाने कारवाई केली होती. या कारवाईचा निषेध स्थानिकांनी केला. या रेलरोकोमुळे आधीच दर रविवारी मध्य रेल्वेकडून घेतल्या जाणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे हैराण झालेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, शुक्रवारप्रमाणेच आजही (रविवार) तशाच प्रकारची कारवाई तब्बल २ हजार घरांवर करण्यात येणार आहे. त्यामुळेच स्थानिक अधिक आक्रमक झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -