घरमुंबईस्वच्छतेची ऐशीतैशी! रेल्वे स्टॉलवर विकलं जातंय हात धुतलेलं लिंबूपाणी!

स्वच्छतेची ऐशीतैशी! रेल्वे स्टॉलवर विकलं जातंय हात धुतलेलं लिंबूपाणी!

Subscribe

कुर्ला रेल्वे स्थानकावरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून रेल्वे स्टॉलवाला तयार लिंबूपाण्यात हात धुवून तेच लिंबूपाणी ग्राहकांना देण्यासाठी झाकून ठेवत असल्याचं दिसलं आहे.

उन्हाळा सुरू झाला आणि मुंबईतल्या रेल्वेस्थानकांवर विकल्या जाणाऱ्या लिंबूपाणीवाल्यांना सुगीचे दिवस आले. मुंबईतल्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या स्टॉलवर लिंबूपाणी विकलं जातं. काही ज्यूस देखील विकले जातात. पण आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अशा स्टॉलवर लिंबूपाणी कसं बनवलं जातं, याचं धक्कादायक वास्तव दिसत आहे. हे वास्तव जितकं धक्कादायक, तितकंच किळसवाणं देखील आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे स्टॉलचा माणूस अक्षरश: हात धुवून लिंबूपाणी तयार करत आहे. पण तो हात बाहेर नाही, तर चक्क त्या लिंबूपाण्यातच धुवत आहे! ‘आपलं महानगर’ने हा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून त्यांनी लागलीच संबंधित स्टॉलवाल्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

लिंबूपाण्यात धुतले कोपरापर्यंत हात!

कुर्ला रेल्वे स्थानकावरच्या प्लॅटफॉर्म नंबर ७ आणि ८च्या मध्ये हा स्टॉलवाला स्टॉलच्या छतावर लिंबूसरबत बनवत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, हे लिंबूसरबत बनवत असताना तो त्याचे पूर्ण हात त्या लिंबूपाण्यामध्ये बुडवत आहे. लिंबूपाण्यासाठी वापरलं जाणारं पाणीदेखील चांगलं असण्याची शक्यता कमीच. धक्कादायक बाब म्हणजे लिंबूपाण्यात मिसळण्यासाठी काढलेल्या पाण्यातच या माणसानं त्याचे हात धुतले आणि तेच पाणी पुन्हा लिंबूपाण्याच्या टाकीत ओतलं!

- Advertisement -

भयानक आहे हे! तुम्हीही रेल्वे स्थानकावरच्या स्टॉलमधून लिंबूपाणी पिताय? मग एकदा पाहा हा व्हिडिओ…कुर्ला स्थानकावर असं बनवलं जातंय लिंबूपाणी! #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮಾರ್ಚ್ 25, 2019

मध्य रेल्वे प्रशासनाचं कारवाईचं आश्वासन

दरम्यान, ‘आपलं महानगर’ने हा व्हिडिओ जारी केल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीनं पावलं उचलली. रेल्वेच्या कमर्शिअल डिपार्टमेंटने लागलीच कुर्ला स्थानकावर धाव घेतली. सदर स्टॉलवाल्यावर जबर दंड किंवा स्टॉलचा परवाना रद्द होण्याची कारवाई होऊ शकते. यासाठी त्याच्या स्टॉलवरच्या उरलेल्या लिंबूपाण्याचे नमुने पुढील तपासासाठी घेण्यात आल्याचं देखील मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -