घरमुंबईटार्गेट पूर्ण करताना दोन्ही रेल्वे टिसींना प्रचंड मानसिक तणाव

टार्गेट पूर्ण करताना दोन्ही रेल्वे टिसींना प्रचंड मानसिक तणाव

Subscribe

रेल्वेत तिकीट तपासाची कमतरता

रेल्वेवरील तिकीट तपासणीना देण्यात येणार्‍या अवास्तव वसुली लक्षाचा परिणाम तिकिट तपासणी आणि तिकीट प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तिकीट वसुली वाढवण्याचे लक्ष देण्यात आल्यामुळे तिकीट तपासणीस मानसिक दबावाखाली येत आहेत. त्याचबरोबर वसुली करण्याच्या अवाजवी लक्षामुळे तिकीट धारक प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत असून गेल्याच आठवड्यात पास असून ही प्रवाशांना दंड भरावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

मुंबई रेल्वेतून रोज सुमारे ८० लाख प्रवासी प्रवास करतात. यापैकी तिकीट आणि पास काढून प्रवास करणार्‍याची संख्या अधिक आहे. लोकल प्रवास हा सर्वांसाठी महत्वाचा असला तरी रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जाणार्‍या सुविधांमध्ये वर्गवारी केली आहे. यासाठी योग्यदर प्रशासनाकडून आखून दिले आहेत. असे असले तरी तिकीट तपासनीसांच्या सायंकाळच्या गैरहाजरीमुळे बरेच फुकटे प्रवासी गैरफायदा घेत आहेत. गेले काही दिवस उपनगरीय रेल्वे मार्गांवरील स्थानकात तिकीट तपासनीस आपले काम चोख बजावत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. आज कामाचे स्वरुप बदलले असून टार्गेट फोकस काम तिकीट तपासनीसांकडून करून घेतले जात आहे. याशिवाय तिकीट तपासनीसांच्या संख्येत घट झाल्याने फुकट्या प्रवाशांचे वाढत आहे.

- Advertisement -

दरवर्षी रेल्वे मंडळाकडून प्रत्येक रेल्वे क्षेत्रातील तिकीट तपासणीसांना वसुलीचे लक्ष देण्यात येत असून यामध्ये भारतीय रेल्वेमध्ये एकूण 17 क्षेत्र आहेत. यापैकी मे 2018- मार्च 2019 या आर्थिक वर्षाकरिता मध्य रेल्वे क्षेत्रासाठी यंदा 73 कोटी 70 लाखांचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे. हे लक्ष गाठण्यासाठी वरिष्ठांकडून तिकीट तपासणी यांच्यावर दबाव आणण्यात येतो. नवे लक्ष पूर्ण करण्यासाठी दर महिन्याला सरासरी 6 कोटी 13 लाख रुपयांची वसुली होणे गरजेचे आहे. त्यातच तिकीट तपासणीच्या शेकडोहुन अनेक जागा रिक्त आहेत. त्या भरण्याबाबत रेल्वे मंडळाकडून कोणतीही कारवाई केली. जात नसल्याचे वास्तव रेल्वे तिकीट तपासणीसाने सांगितले.

तिकीट तपासकाची भरती आवश्यक
१० वर्षांपूर्वी तिकीट तपासनीसांची संख्या १५०० एवढी होती. आज वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या वाढण्याऐवजी घटत चालली आहे. सध्या ही संख्या १२०० एवढी असून यातील ३५० तिकीट तपासनीस हे खेळाडू या आरक्षित कोट्यातून असल्याने त्यांचे कामातील योगदान मोजके असते. दरम्यान, बाकी ८०० पैकी ६०० तिकीट तपासनीस हे तीन टप्प्यांत काम करत असून २०० तिकीट तपासनीस गाड्यांवर कार्यरत आहेत. त्यातच रेल्वे प्रशासनाने ९० कोटी तिकीट वसुलीचा अतिरिक्त भार दिल्याने लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळं कमी असलेल्या तिकीट तपासनीस विभागाची दमछाक होते. यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर भरती करावी, अशी मागणी तिकीट तपासनीसांची आहे.

- Advertisement -

तिकीट तपासकाना मानसीक तणाव
यंदाचे तिकीट वसुलीचे लक्ष्य ९० कोटी असल्याने लोकलऐवजी मेल-एक्सप्रेसमधील प्रवाशांकडून दंड वसूली करण्याकडे तिकीट तपासनीसांचे लक्ष्य आहे. यामुळे लोकलमध्ये प्रथम श्रेणीतून बिनधास्त विनातिकीट प्रवास करणार्‍याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा त्रास प्रथम श्रेणीतील प्रवाशांना होतो. याशिवाय सुट्ट्यांच्या काळातील अथवा सणांच्यावेळी गर्दी वाढत असल्याने तिकीट तपासनीसांना गर्दीत काम करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे सध्या तिकीट तपासनीस आपले काम चोख आणि प्रमाणिकपणे बजावत असले तरी त्यांना प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असल्याचे नाव न छापण्याचता अटीवर एक तिकीट तपासनीसांनी सांगितले आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -