घरमुंबईग्रामपंचायत निवडणुक: संधीचं सोनं करा; विजयी उमेदवारांना राज ठाकरेंची शाबासकी

ग्रामपंचायत निवडणुक: संधीचं सोनं करा; विजयी उमेदवारांना राज ठाकरेंची शाबासकी

Subscribe

ग्रामपंचायत निवडणूकीत मनसेला घवघवीत यश

राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूकांचे निकाल हाती आले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच कोरोनाच्या महामारीत निवडणूका घेण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी निवडणूकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतीष्ठा पणाला लावली होती. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपासह मनसेनेही ग्रामपंचायत निवडणूकीत आपली कंबर कसली होती. राज्यात अनेक ग्रामपंचायतीत मनसेने घवघवीत यश मिळवले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घोषणा केल्यानुसार मनसेने राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका लढवल्या होत्या. यामुळे मनसेला चांगलेच यश मिळाले असल्याचे दिसते आहे. मनसेने एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवत शिवसेनेलाही दणका दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. तर त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या. अशा आशयाचे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

राज्यात मनसेने मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. यवतमाळ जिल्ह्यात मनसेने १५ जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत मनसेचे इंजिन सुसाट धावल्याचे चित्र दिसत आहे. तसेच अंबरनाथ तालुक्यातील काकोळी गावात मनसेने विजय मिळवला आहे. अमरावतीतही मनसेला ७ पैकी ७ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे.

- Advertisement -

मनसेने सोलापूरमधील करमाळीा तालुक्यातील ग्रामपंचायतीत ७ पैकी ५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर अहमदनगरमधील शिरसाटवाडी ग्रामपंचातीत मनसेचे ९ सदस्य विजयी झाले आहेत. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीमधील सातपैकी ५ जागांवर मनसेने विजय मिळवला. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये ७ पैकी ६ जागांवर मनसेला झेंडा फडकविण्यात यश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -