घरमुंबईRamesh Chennithala : चव्हाणांनी सांगायला हवं त्यांच्यावर कुठला दबाव आहे; चेन्नीथला यांचं...

Ramesh Chennithala : चव्हाणांनी सांगायला हवं त्यांच्यावर कुठला दबाव आहे; चेन्नीथला यांचं आव्हान

Subscribe

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज काँग्रेसमधील नेत्यांच्या भेटी घेतल्या. सोबतच शरद पवारांचीही भेट घेऊन घडलेल्या घडामोडीवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडीनंतर काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांनी आज 13 फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या घडामोडीवर भाष्य केलं आहे. अशोक चव्हाणांनी सांगायला हवं की, काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये जाण्यासाठी कुठलाही दबाव होता. असं खुलं आवाहन त्यांनी दिलं. (Ramesh Chennithala Chavan should tell what pressure is on him Chennithalas challenge)

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज काँग्रेसमधील नेत्यांच्या भेटी घेतल्या. सोबतच शरद पवारांचीही भेट घेऊन घडलेल्या घडामोडीवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडीनंतर काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील कोणताच नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता जाणार नाही.

- Advertisement -

काँग्रेस एकजूट होऊन खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काम करेल. जे लोक पक्ष सोडून जात आहेत ते एकटेच जाणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसमधील कुणीच नसणार, महाराष्ट्रातील जनताही त्यांना स्वीकारणार नाही. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की, अशोक चव्हाण हे परवा आमच्यासोबत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हजर होते. तेथे त्यांनी याबाबत कुठलीच वाच्यता केली नाही. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भेट घेतली होती. दिल्लीतील सर्व नेत्यांशी चर्चा केली. परत येऊन त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशीही चर्चा केली. त्यांनी काँग्रेस का सोडली याचं त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. त्यांनी सांगायला हवं की, काँग्रेसची कोणती नीती चुकीची आहे. त्यांनी सांगायला हवं की, पक्षाने त्यांच्यासाठी काय केलं नाही? पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला असेल तर त्यांनी ते एक राजकीय नेता या नात्याने स्पष्ट करणं गरजेचं असल्याचेही चेन्नीथला यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Politics : राज्यसभेसाठी शरद पवारांचा नवा मास्टरस्ट्रोक; ‘या’ उमेदवाराचा प्रस्ताव मांडला

- Advertisement -

पुढे बोलताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, त्यांना काँग्रेस पक्षाने काय दिलं नाही. दोनवेळा मुख्यमंत्रीपद दिलं. 15 वर्ष ते मंत्री होते. सीडब्ल्यूसी ते सदस्य होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते अध्यक्षही होते. त्यांना पक्षाने सगळं काही दिलं. त्यांना पक्षाने पुढे केलं. त्यांना नेता बनवलं. मात्र तरीही ते पक्ष सोडून जातायेत. जे पक्ष सोडून जातायेत त्यांना लोक स्वीकारणार नाहीत. त्यांच्यासोबत एकही काँग्रेसी जाणार नाही. पक्ष बदलणाऱ्यांना लोक पसंत करत नाही.

हेही वाचा : Fadnavis on Ashok Chavan : फडणवीसांनीच दिले चव्हाणांच्या राज्यसभेचे संकेत

अशोक चव्हाणांनी सांगायला हवं की त्यांच्यावर ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे का? त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने अन्याय केला का? हे त्यांनी सांगालया हवं. आज मी त्यांनी पत्रकार परिषद बघितली त्यामध्ये त्यांनी पक्ष सोडण्याचं कुठलंच कारण सांगितलं नाही. तेव्हा त्यांच्या जाण्याने काँग्रेसला कुठलाच फरक पडणार नाही. आणि ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांनी घोटाळे केले त्यांना पक्षात घेण्यासाठी पक्षाने दरवाजे उघडून ठेवले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करताच त्यांनी पक्ष बदला. तेव्हा प्रश्न पडतो की, भाजप पक्ष का वॉशिंग मशीन झाली का? असाही हल्ला चेन्नीथला यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -