घरमुंबईराणीची बाग 16 नोव्हेंबर रोजी बंद; काय आहे कारण?

राणीची बाग 16 नोव्हेंबर रोजी बंद; काय आहे कारण?

Subscribe

मुंबई : भायखळा येथील राणीची बाग ही दर बुधवारी प्राण्यांच्या देखभाल व सफाई कामासाठी बंद ठेवण्यात येते. मात्र यंदा 15 तारखेला भाऊबीज सण आला आहे. या सणानिमित्त सर्वांना सुट्टी असल्याचे विचारात घेता मुंबई महापालिकेने राणीची बाग पर्यटकांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 16 नोव्हेंबर रोजी प्राण्यांची देखभाल, सफाई काम आदी कारणांसाठी राणीची बाग पर्यटकांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. (Rani Chi Bagh closed on November 16 What is the reason)

हेही वाचा – वरातीमागून घोडे : फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्यावर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे BMC चे आवाहन

- Advertisement -

बुधवार 15 नोव्हेंबर रोजी नागरिकांना सार्वजनिक सुट्टी असल्याने राणीची बाग जनतेकरिता खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी राणीची बाग बंद असणार आहे. वास्तविक, राणीची बाग साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, मुंबई महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी राणीची बाग जनतेसाठी खुली ठेवण्यात येईल, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी राणीची बाग बंद ठेवण्यात येते. या ठरावानुसार बुधवार 15 नोव्हेंबर रोजी राणीची बाग जनतेसाठी खुली राहणार आहे, असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा – बेस्टकडून मुंबईकरांना भाऊबीज भेट; ‘या’ मार्गांवर धावणार 145 जादा बसेस

- Advertisement -

राणीच्या बागेला सव्वा महिन्यात दोन लाख पर्यटकांची भेट

भायखळा येथील राणीच्या बागेत ऑक्टोबर महिन्यात 1.70 लाख पर्यटकांनी भेट दिल्यामुळे राणी बाग प्रशासनाच्या तिजोरीत 69 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. तर 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत 37 हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे या कालावधीत प्रशासनाच्या तिजोरीत 15 लाख 45 हजार रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. म्हणजेच सव्वा महिन्यात राणीच्या बागेला 2 लाख 8 हजार पर्यटकांनी भेटी दिली असून सव्वा महिन्यात राणीच्या बागेतील तिजोरीत 85 लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -