घरमुंबईअश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; बोगस कास्टिंग डायरेक्टरला अटक

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; बोगस कास्टिंग डायरेक्टरला अटक

Subscribe

कथित कास्टिंग डायरेक्टरला अटक; वर्सोवा पोलिसांकडे ताबा,सातहून अधिक महिलांकडे खंडणीची मागणी केल्याचे तपासात उघड

महिलांचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हारयल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करणार्‍या एका कथित कास्टिंग डायरेक्टरला मंगळवारी वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सिद्धार्थ सरोदे असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी वर्सोवा पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. प्राथमिक तपासात त्याने आतापर्यंत सातहून अधिक महिलांकडे खंडणीची मागणी करुन त्यापैकी काही महिलांकडून पैसे वसुल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसह अश्लील वर्तन तसेच धमकीचा गुन्हा नोंदविला होता. तक्रादार अभिनेत्रीचा फोटो मॉर्फ करुन तिचा चेहरा आणि दुसर्‍या महिलेचे शरीर असलेला एका पुरुषासोबत प्रणय करीत असताना फोटो तिला पाठवून या व्यक्तीने तिच्याकडे एक लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वर्सोवा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी संमातर तपास सुरु केला होता. पोलीस शिपाई पाटील प्रफुल्ल पाटील, महिला शिपाई पुजारी यांनी आरोपीचा मोबाईलचा तपास सुरु करुन त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisement -

तब्बल बारा दिवसानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन आरोपी हा चेंबूर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकातील आशा कोरके, सावंत, जाधव, कोरे, आंबवडे, शिर्के, गावकर, सावंत, वारंगे, पेडणेकर, नाईक, राऊत, पाटील, खरटमोल, कांबळे, महांगडे, पुजारी यांनी सिद्धार्थ सरोदे याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले, चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सिद्धार्थ चेंबूरच्या चिमनपाडा झोपडपट्टी राहत असून त्याने दोन तरुणीशी विवाह केला होता. सध्या तो बेरोजगार असून मिळेल ते काम करतो. त्याने स्वत कास्टिंग डायरेक्टर असल्याची बतावणी करुन काही महिलांचे फोटो घेतले होते. त्यांना मालिकासह चित्रपटामध्ये कामाचे आमिष दाखविले होते, त्यानंतर त्यांचे फोटो मिळवून ते फोटो पिक्सआर्ट या गुगल अ‍ॅपच्या मदतीने मॉर्फ करुन त्यांचे नग्न फोटो बनवून त्यांना ते फोटो पाठवून खंडणीची मागणी करीत होता.

खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची तो धमकी देत होता. काही महिलांनी बदनामीच्या भीतीने त्याला पैसेही दिले होते. आपण पकडले जाऊ नये म्हणून त्याने पुरेपुरे काळजी घेतली होती, त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे ठोस पुरावा नव्हता, तरीही त्याला सलग बारा दिवसांच्या कठोर परिश्रमानंतर वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी वर्सोवा पोलिसांकडे सोपविण्यात आले असून याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -