घरमुंबईशस्त्रक्रियेनंतर २४ तासांत तरुणाला मिळाला आवाज

शस्त्रक्रियेनंतर २४ तासांत तरुणाला मिळाला आवाज

Subscribe

जे.जे हॉस्पिटलमध्ये श्वसनाच्या आजारावर दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

जे.जे हॉस्पिटलच्या कान नाक घसा विभागातील डॉक्टरांमुळे एका व्यक्तीला आवाज फुटण्यात यश आलं आहे. अतिशय दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यवतमाळमधील २७ वर्षीय तरुण दोन वर्षापूर्वी विषबाधेच्या कारणास्तव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. या तरुणाला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्या श्वसनलिकेमध्ये ट्रकीयोस्टोमि करुन यंत्र बसवण्यात आलं होतं. ज्यामुळे तरुणाला बोलण्यात अडथळा येऊ लागला. त्यामुळे, त्याला बोलताना यंत्रावर हात ठेवून हवेचा वापर करत बोलावं लागत होतं. त्यानंतर स्विझरलँडच्या डॉ. फिलप मुलियार यांच्या मदतीने जे. जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली आणि तब्बल दोन वर्षाने या तरुणाला आवाज फुटला आहे. डॉ फीलप मुनियार वर्षातून एकदा जे.जे हॉस्पिटलला भेट देतात. मुनियार यांना या रुग्णाविषयी माहिती मिळाली त्यानंतर तातडीने त्यांनी ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

श्वसनाच्या आजारावर दुर्मिळ शस्त्रक्रिया

बोलायला होणारा त्रास लक्षात घेत तो तरुण रुग्ण जे. जे हॉस्पिटलच्या कान नाक घसा विभागात तपासणीसाठी दाखल झाला. त्यानंतर, डॉक्टरांनी रुग्णाची वैद्यकीय माहिती घेतली. त्यानंतर त्याला लॅरिंगोट्रकीएल रिकन्स्ट्रशन सर्जरी करण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेत अंकुचित आणि निकामी झालेला भाग काढून वरचे स्वरयंत्र श्वसननलिकेशी जोडण्यात येते. पण, शासकीय हॉस्पिटलमध्ये अशाप्रकारची सर्जरी क्वचितच केली जात असून खासगी हॉस्पिटलमध्ये या सर्जरीसाठी लाखो रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, डॉ. मुनियार यांनी जे. जे हॉस्पिटलच्या डॉ. चव्हाण यांच्या टीमसोबत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

- Advertisement -

शस्त्रक्रियेनंतर फक्त २४ तासात या तरुणाला आवाज फुटला. ही सर्जरी करताना भुल तज्ञ म्हणून डॉक्टर गद्रे आणि त्यांची टिम उपस्थित होतीडॉ.अजय चंदनवाले; अधिष्ठाता, जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल


हेही वाचा – हृदयाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मिरजेत यशस्वी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -