घरताज्या घडामोडीडेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांचा राजीनामा

डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांचा राजीनामा

Subscribe

डेप्युची गव्हर्नर एन.एस.विश्वनाथन यांनी राजीमाना दिल्यामुळे आरबीआयला मोठा धक्का बसला आहे.

महागाई, जीडीपीमध्ये घसरण यांसारखी आव्हाने अर्थव्यवस्थेसमोर असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) डेप्युची गव्हर्नर एन.एस.विश्वनाथन यांनी राजीमाना दिला आहे. याचा आरबीआयला मोठा धक्का बसला आहे. विश्वनाथन यांच्या राजीनाम्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिली आहे. त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, ३१ मार्चला विश्वनाथन हे आपले पद सोडणार आहेत. जवळपास ४० वर्षांची कारकीर्द असलेले विश्वनाथन हे जून महिन्यात निवृत्त होणार होते. परंतु त्यांनी मुदतीआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ताणतणावामुळे आरोग्यावर परिणाम होत असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

जून २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला होता. तसेच यापुर्वी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर २०१८ मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. वर्षभरात राजीनामा देणारे विश्वनाथ तिसरे उच्चपदस्थ अधिकारी ठरले आहेत. विश्वनाथन हे १९८१ साली आरबीआयमध्ये सेवेत रूजू झालेले बँकिंग क्षेत्रातील खूप जाणकार मानले जातात. तब्येतीचे कारण पुढे करत विश्वनाथन यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

विश्वनाथन यांचे बँकिंग क्षेत्राकडे बारीक नजर

विशेषकरून नियम आणि कायद्यासंबंधी त्यांना चांगलीच जाण आहे. त्यामुळे गेल्यावर्षी जून महिन्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास त्यांनी विश्वनाथ यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. विश्वनाथन हे बँकिंग नियमन, सहकार क्षेत्रातील बँकिंग, ठेवी विमा यासह अनेक क्षेत्रावर लक्ष ठेवून होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -