घरमुंबईमुंबईतील नऊ पोलीस उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या

मुंबईतील नऊ पोलीस उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या

Subscribe

मुंबई पोलीस दलातील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांतील गोंधळामुळे निर्माण झालेला वाद अजून विरला नसताना शुक्रवारी पुन्हा एकदा गृह विभागाकडून बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यावेळी नऊ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे बदल्यांची ही माहिती आता मुख्यमंत्री, गृहमंत्री कार्यालयाला कळविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

परमजीत दहिया यांची झोन सातमधून पाचमध्ये, संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची झोन सातमध्ये, विशेष शाखा एकचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची पोर्ट झोनमध्ये, पोर्ट झोनच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची सायबर सेलमध्ये, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांची विशेष शाखा एकमध्ये, झोन अकराचे पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांची लोकल आर्म्स ताडदेवमध्ये, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची झोन अकरामध्ये, ऑपरेशन विभागाचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांची झोन पाचमध्ये तर लोकल आर्म्स ताडदेवचे पोलीस उपायुक्त नंदकुमार ठाकूर यांची गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

या बदल्यांच्या आदेशाची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री कार्यालयासह पोलीस महासंचालकासह इतर संबंधित विभागाला देण्यात आली आहे. शुक्रवारी बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये संग्रामसिंह निशाणदार यांचे नाव नाही आहे. त्यांची यापूर्वी प्रणय अशोक यांच्या जागीच नियुक्ती झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -