घरमुंबईलिंग परिवर्तनानंतर रिटा बनणार रित कुमार सिंघा

लिंग परिवर्तनानंतर रिटा बनणार रित कुमार सिंघा

Subscribe

आसामच्या रिटादेवीवर लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया झाली तर तिला तिची खरी ओळख मिळणार आहे. मुलगी म्हणून जगत असलेल्या रिटादेवीचं नाव लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेनंतर रित कुमार सिंघा असं होणार आहे. पुढचे काही महिने रिटादेवीला हार्मोन्स ट्रिटमेंट दिली जाणार आहे.

बीडच्या २९ वर्षीय ललित साळवे यांच्यावर लिंग पुनर्रचनेच्या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता सेंट जॉर्ज रुग्णालयात अनेक कॉल्स यायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, लिंगपरिवर्तनासंबंधित आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण १३ कॉल्स रुग्णालयातील डॉक्टरांना आले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रात आसामच्या होजाई या भागातून ३४ वर्षीय रिटादेवी सिंघा लिंगपरिवर्तनासाठी दाखल झाली आहे. रिटादेवीवर सुद्धा लवकरच लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया होणार आहे. त्या आधी तिच्यावर हार्मोन्स ट्रीटमेंट सुरू करण्यात येणार आहे. त्यातून होणाऱ्या बदलानंतरच तिच्यावर लिंगपरिवर्तन किंवा लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया करायची की नाही? याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतला जाणार आहे. हार्मोन्स थेरेपीसोबत रिटाला मानसिक सल्ले देणं ही गरजेचं आहे. ती ट्रिटमेंट त्यासोबतच सुरू केली जाणार आहे.

किमान ६ महिने ते १ वर्षांपर्यंतची हार्मोन्स ट्रिटमेंट

बुधवारी म्हणजेच २६ सप्टेंबर यादिवशी रिटादेवी पुन्हा एकदा तिच्या पुढच्या ट्रिटमेंट आणि सल्ल्ल्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात आली. त्यानुसार, गुरुवारी तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अनेक चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी तिला गुरुवारी रुग्णालयात अॅडमिट करुन घेतलं जाणार आहे. तिला सध्या पोट दुखीची तीव्र समस्या आहे. त्याबाबतही तपासण्या करुन नेमकी काय अडचण आहे ? याचं निदान केलं जाणार आहे. यानंतर तिला पुढच्या ६ ते १ वर्षांपर्यंत हार्मोन्स बदलण्याची ट्रिटमेंट दिली जाणार आहे.

रिटादेवी या आधी २५ जुलैला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाली होती. पण, आसाम सरकारच्या परवानगीशिवाय तिच्यावर शस्त्रक्रिया करणं शक्य नसल्याचं सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

रिटाला आसाम सरकारची परवानगी बंधनकारक

रिटा देवी गेली ३७ वर्ष महिला म्हणून जगत आहेत. पण, ललिलतवर झालेल्या यशस्वी लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेनंतर तिने मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातून शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतला. पण, तिला त्यासाठी अनेक परवानग्या घेण्याची गरज आहे. रिटाला लिंगपरिवर्तनासाठी गॅझेट नोटीफिकेशन म्हणजे आसाम सरकारच्या परवानगीची गरज आहे. त्याआधी तिने सेल्फ डिक्लेरेशन आणि नोटरी सर्टिफिकेट तयार केले आहे, असं तिचे नातेवाईक प्रॉसेनजीत पॉल यांनी ” माय महानगर” ला सांगितलं आहे.

“मला आधीपासूनच मी पुरुष असल्याचं जाणवत होतं. पण, भीतीपोटी कधीच बोलले नव्हते. आता ललितच्या शस्त्रक्रियेनंतर मी हा निर्णय घेतला. मला मासिक पाळी ही येते. पण, त्यावेळेस होणाऱ्या वेदना या सहन नं करण्यासारख्या असतात. त्यावेळेस जवळपास ३ ते ४ जण मला सांभाळण्यासाठी लागतात. शिवाय, सतत माझ्या पोटात दुखत असतं. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार माझ्या तपासण्या केल्या जाणार आहेत. लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेआधी माझ्यावर हार्मोन्स ट्रिटमेंट सुरू करण्यात येणार आहे.” – रिटा देवी, रुग्ण

रिटाला कुटुंबाचा ही सपोर्ट

शस्त्रक्रियेसाठी रिटा देवीला तिच्या कुटुंबाकडून ही सपोर्ट मिळाला आहे. रिटादेवीला २ बहिणी आहेत. अशा त्या तीन बहिणी आहेत. पण, रिटाला आधीपासूनच ती मुलगा असल्याचा संशय होता. आता रिटादेवीसोबत रुग्णालयात तिचा मानलेला भाऊ प्रॉसेनजीत पॉल आणि मामा आले आहेत.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -