घरमुंबई'गेली मुंबई खडड्यात!', मलिष्काचे आणखी एक गाणे

‘गेली मुंबई खडड्यात!’, मलिष्काचे आणखी एक गाणे

Subscribe

मलिष्काच्या गाण्याची झलकं पाहिल्यानंतर आता मलिष्काचे पूर्ण गाणं कसे असेल अशी उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल पण थोड थांबा आता अगदी काहीच मिनिटात मलिष्काचे हे नवं गाण लाँच होणार आहे.

मुंबईच्या खडड्यांवर अत्यंत मार्मिकपणे गाण्यातून टिका करणारी आरजे मलिष्का आणि तिचं गाणं प्रत्येक मुंबईकरांच्या लक्षात आहे. ‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का?’ हे गाणं तयार करुन तिने मुंबईतल्या खड्डयांचा विषय धरुन ठेवला. तिच्या या गाण्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. मलिष्काची ढाल करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले. आणि आता आणखी एकदा खडड्यांचा विषय घेऊन एका नव्या गाण्याच्या रुपात मुंबई की रानी मलिष्का आली आहे. तिचे हे गाणं बघायलाच हवं.

- Advertisement -

काल मलिष्काने या गाण्याचा एक लूक तिच्या ट्विटरवरुन शेअर केला आणि अवघ्या काहीच मिनिटात तिच्या फॅन्सनी हे गाणं व्हायरल केले.

 

- Advertisement -

सैराटमध्ये रंगले नवं गाणं

गेल्यावर्षी सोनूच्या गाण्याची क्रेझ होती. ते गाणं घेऊनच मलिष्काने खड्ड्याची खमंग शाब्दिक फोडणी घातली होती. आणि यंदा हे गाणं सैराटच्या रंगात रंगलेले दिसत आहे. अगदी दोनच दिवसांत सैराटचा हिंदी रिमेक धडक रिलीज होणार आहे. त्यामुळे त्यातील हिंदी गाणी सध्या धुमाकूळ घालत आहेत. यातील झिंगाटच्या म्युझिकवर मलिष्काने हे गाणे तयार केले आहे.

सोनू, तुला बीएमसीवर भरवसा नाय का?

आता गेल्यावर्षीच्या मलिष्काच्या या गाण्याची तुम्हाला आठवण नक्कीच झाली असेल. या गाण्यावरुन झालेला गदारोळ देखील आठवला असेल. ‘मुंबईचे खड्डे कसे खोल खोल, खड्ड्यांचा आकार कसा गोल गोल’, असे या गाण्याचे बोल होते. मुंबईकरांना हे गाणं पटलं आणि त्यामुळे अवघ्या काहीच मिनिटात व्हायरल झाले. तिच्या या गाण्यानंतर अनेकांनी ‘सोनू’  आणि मलिष्काच्या गाण्याची प्रेरणा घेऊन गाणी तयार केली. एकदा बघुयात आरजे मलिष्काचं हे खड्डे स्पेशल गाणं.

(सौजन्य-रेड एफएम)

मलिष्का या गाण्याने जितकी प्रसिद्ध झाली तितकी ट्रोलसुद्धा झाली. महापालिकेकडून मात्र तिला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर तिची बाजू देखील सोशल मीडियावर घेण्यात आली आणि महापालिकेविरोधी वातावरण तापू लागले. नेमकं तिच्या सहकाऱ्यांनीही तिची बाजू घेणारा नवा सोनू र्व्हजन तयार केला.

(सौ. रेड एफएम) 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -