घरमुंबईकरोनामुळे आरटीईचे प्रवेश स्थगित

करोनामुळे आरटीईचे प्रवेश स्थगित

Subscribe

राज्यातील1 लाख विद्यार्थ्यांना लागली लॉटरी

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत 25 टक्के आरक्षणांतर्गत राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेत राज्यातून विजेत्या ठरलेल्या 1 लाख 920 विद्यार्थ्यांची नावे शिक्षण विभागाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली. परंतु राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शाळा बंद असल्याने आरटीईची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. आरटीई प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती संकेतस्थळावर पालकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रियेत राज्यभरातील 9 हजार 331 शाळांमध्ये असलेल्या 1 लाख 15 हजार 446 जागांसाठी तब्बल 2 लाख 91 हजार 370 अर्ज आले होते. यातील तब्बल 1 लाख 920 विद्यार्थी सोडतीमध्ये विजेते ठरले आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेची सोडत 17 मार्चला निघाली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे विजेत्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यास शिक्षण विभागला विलंब झाला. अखेर शिक्षण विभागाकडून शनिवारी विद्यार्थ्यांची नावे जाहीर करत त्यांना एसएमएस पाठवण्यात आले आहे. पुण्यातून आलेल्या 62 हजार 919 अर्जांपैकी 16 हजार 617 विद्यार्थ्यांची आरटीईसाठी निवड झाली आहे. त्याखालोखाल ठाणे (9326), नागपूर (6685, मुंबई (5371), नाशिक (5307) येथील विद्यार्थ्यांची निवड झाली. सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाली असली तरी देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पसरत असलेल्या करोना विषाणूमुळे सध्या शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

- Advertisement -

त्यामुळे शाळा बंद आहेत तसेच कागदपत्रे पडताळणी समिती सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पालकांनी शाळेत किंवा पडताळणी समितीकडे जाऊ नये असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. पालकांना पुढील प्रक्रिया वेबसाईच्या माध्यमातून कळवण्यात येईल, तसेच ज्या पालकांना एसएमएस आले नाहीत, त्यांनी वेबसाईटवर आपला अर्ज टाकून तपासणी करण्यात यावे, असेही शिक्षण विभााकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतून 5371 विद्यार्थ्यांची निवड
मुंबईतील 367 शाळांमधून आरटीई प्रवेश दिले जातात. यामध्ये एसएससी बोर्डाशी सलंग्न 297 तर अन्य बोर्डाशी 70 शाळा संलग्न आहेत. या 367 शाळांमधून 7069 जागा असून, या जागांसाठी मुंबईतून तब्बल 14 हजार 135 अर्ज आले होते. त्यातील सर्वाधिक 12 हजार 402 अर्ज हे एसएससी बोर्डातील तर 1733 अर्ज हे अन्य बोर्डातील शाळांसाठी आले होते. त्यातील एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये 4053 तर अन्य बोर्डाच्या शाळांमधील 1318 अशा 5371 जागांवार विद्यार्थ्यांची निवड झाली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -