घरताज्या घडामोडीसमीर वानखेडेंना अद्याप मुदतवाढ नाही, ३१ डिसेंबरला संपणार कार्यकाळ

समीर वानखेडेंना अद्याप मुदतवाढ नाही, ३१ डिसेंबरला संपणार कार्यकाळ

Subscribe

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना अद्याप मुदतवाढ देण्यात आलेली नाही. समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपणार आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात कोणतीही मुदतवाढ दिली गेलेली नाही.
समीर वानखेडे यांच्या कार्यकाळ संपण्यासाठी केवळ १३ दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र त्यांच्या मुदतवाढीचे कोणतेही संकेत आलेले नाही त्यामुळे समीर वानखेडेंना खुर्ची रिकामी करावी लागणा का? आणि समीर वानखेडेंच्या ऐवजी एनसीबीच्या विभागीय संचालकाच्या जागी आता नवीन अधिकारी येणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याचप्रमाणे समीर वानखेडे हे ३१ डिसेंबरपासून रजेवर जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले ज्यामुळे वानखेडे अडचणीत सापडले. त्यामुळे एनसीबीकडून आर्यन खान प्रकरणाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आली.

- Advertisement -

आर्यन खानला अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या अनेक आरोप केले. मधल्या दिवसात समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू होती. त्यानंतर  समीर वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून एनसीबीची स्पेशल टीम मुंबई दाखल झाली. त्यानंतर एनसीबीकडून समीर वानखेडे यांच्याकडे असलेली मुंबईतील काही प्रकरणे काढून घेण्यात आली.


हेही वाचा – OBC Reservation : इम्पेरिकल डाटाबाबत सरकार असत्य बोलतंय, कोंडी करण्याचा प्रयत्न – छगन भुजबळ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -