घरCORONA UPDATECoronavirus: महापालिकेच्या उप प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यालाच कोरोनाचा संसर्ग

Coronavirus: महापालिकेच्या उप प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यालाच कोरोनाचा संसर्ग

Subscribe

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा असताना आता याच विभागाच्या उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या अधिकाऱ्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे. चार दिवसांपूर्वी या अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर रुग्णालयात दाखल केले आहे. विशेष म्हणजे हे अधिकारी महापालिका मुख्यालयात कार्यरत होते.

महापालिका मुख्यालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षाती दोन कर्मचारी तसेच मालमत्ता विभागाच्या एका शिपायाला कोरोनाच्या विषाणूची बाधा झाल्याने येथील सर्व कमचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु चार दिवसांपूर्वी मुख्यालयातील सुरक्षा खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यालाच कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे आतापर्यंत सुरक्षा खात्यात या अधिकाऱ्यासह ११ जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी घरी केस कर्तनालयातील कर्मचाऱ्याला बोलावून हेअर कट केली होती. त्यामुळे या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली ना याचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

सहायक आयुक्तांच्या कुटुंबालाच कोरोनाची लागण

मुंबईत सर्वांधिक करोनाबाधित रुग्ण असलेल्या आण नव्याने यापदाची सुत्रे हाती घेणाऱ्या सहायक आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. कुटुंबातील सदस्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असतानाही या सहायक आयुक्तांची अद्यापही चाचणी करण्यात आलेली नाही. मात्र, कुटुंबाला बाधा झाल्यापासून या अधिकाऱ्याने घरी जाणे बंद करत हॉटेलमध्ये राहूनच विभागाचा कार्यभार सांभाळण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -