घरमुंबईहातात तिरंगा घेऊन धावले आजी-आजोबा

हातात तिरंगा घेऊन धावले आजी-आजोबा

Subscribe

डोंबिवलीत मॅरेथॉनमध्ये शहीद जवानांना श्रध्दांजली

मनसे आयोजित ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन स्पर्धा डोंबिवलीत पार पडली. मॅरेथॉनमध्ये साधारण 725 ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये 90 वर्षांचे रामचंद्र दादाजी गांगुर्डे आणि 90 वर्षांचे कोरगावकर काका यांचाही विशेष सहभाग होता. यावेळी शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून आणि हातात तिरंगा घेऊन आजी-आजोबा धावले.भारतासह सहा देशांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा जिंकून विक्रम करणारे एकनाथ पाटील, जलतरणपटू स्पर्धकांना प्रशिक्षण देणार्‍या तज्ज्ञ प्रशिक्षक उषा परांजपे आणि थाळीफेकमध्ये नॅशनल गोल्ड मेडल मिळवणारे सुशांत सोनवणे यांनी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढविला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर आयोजित ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन 2019 ला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मॅरेथॉनचे हे सहावे वर्ष आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच सकाळी सात वाजता जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यातील जे दोन वीर जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबाला मनसे डोंबिवली शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी प्रत्येकी 51 हजार रुपयांची मदत जाहीर केली. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, जिल्हाध्यक्ष दीपिका पेडणेकर, जिल्हा सचिव प्रकाश माने, गटनेते मंदार हळबे, उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाईक, जिल्हा सचिव निलेश भोसले, शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे, शहर अध्यक्षा मंदाताई पाटील, मनविसे शहर अध्यक्ष सागर जेधे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -