घरमुंबईप्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांसाठी सरसावले वरिष्ठ विद्यार्थी

प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांसाठी सरसावले वरिष्ठ विद्यार्थी

Subscribe

मिठीबाई कॉलेजच्या प्रवेशासाठी येणार्‍यांना केले मार्गदर्शन

कॉलेजच्या सुरुवातीला वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून नव्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची रॅगिंग केली जाते. सध्या रॅगिंगवर बंदी असली तरी अधूनमधून हे प्रकार घडत असतात. मात्र मिठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मात्र वेगळाच पायंडा घातला आहे. सध्या तेरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून अनेक विद्यार्थी व पालक नामवंत कॉलेजमध्ये प्रवेशप्रक्रियेसंदर्भात माहिती घेण्यासाठी जात आहेत. परंतु त्यांना कॉलेजची माहिती नसल्याने व प्रवेश प्रक्रियेबाबत मनामध्ये काहीसा गोंधळ असल्याने त्यांची कॉलेजभर फिरावे लागते. पालक व विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी मिठीबाई कॉलेजच्या बायोकेमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांनी ‘उबूंटू’ उपक्रमांतर्गत मानवतेचे दर्शन घडवत त्यांना प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी सहकार्य केले आहे.

कॉलेजमध्ये प्रवेशासाठी जाणार्‍या विद्यार्थी व पालकांना चौकशी कोठे करायची, प्राचार्य कोठे मिळतील किंवा प्रवेश प्रक्रिया काय आहे याची माहिती नसल्याने त्यांना कॉलेजमध्ये त्यांना इकडेतिकडे फिरावे लागत आहे. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ लक्षात घेऊन प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थी व पालकांचा त्रास कमी करण्यासाठी मिठीबाई कॉलेजच्या बायोकेमिस्ट्रीच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘उबूंटू’ उपक्रमांतर्गत पुढे सरसावले आहेत. कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून स्टॉल सुरू करण्यात आला आहे. या स्टॉलवर विद्यार्थी व पालकांना वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती देण्याबरोबरच त्यांना विविध विभागाची माहितीही देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडून पालकांना पाण्याचे वाटप करणे, कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी मदत करणे, विविध विभागांची माहिती देणे, कार्यालयाची माहिती देणे यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

कॉलेजच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या मदतीमुळे पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सहकार्याबाबत पालकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. कॉलेजमध्ये नव्याने येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे पहिल्यांदाचा उपक्रम राबवण्यात येत असल्यामुळे मिठीबाईमध्ये येणार्‍या पालकांच्या मनातमध्ये कॉलेजबाबत चांगले मत निर्माण होण्यास मदत होत आहे. मिठीबाई कॉलेजमधील बायोकेमिस्ट्री विभाग हा फार महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाकडून शैक्षणिक वर्षात अनेक उपक्रम राबवण्यात येतात.

सध्या समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती हा स्वत:चा विचार करत असतो. परंतु मिठीबाई कॉलेजच्या उबूंटूची संकल्पना ही एकमेकांना एकत्र आणण्याची आहे. एखादी व्यक्ती जेव्हा ही संकल्पना आत्मसात करतो तेव्हा तो समाजातील प्रत्येकासाठी उपलब्ध होतो. उंबूंटूमुळेच वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये नव्याने येणार्‍या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
– डॉ. राजपाल हांडे, प्राचार्य, मिठीबाई कॉलेज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -