घरमुंबईसिरियल रेपिस्ट कुरेशीचे 18 गुन्हे उघड, दोन हत्यांची कबुली

सिरियल रेपिस्ट कुरेशीचे 18 गुन्हे उघड, दोन हत्यांची कबुली

Subscribe

अल्पवयीन मुलीना फूस लाऊन त्यांच्यावर बलात्कार करणार्‍या सिरियल रेपिस्ट रेहान रेपिस्ट कुरेशीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात केलेल्या तब्बल १८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.या गुन्ह्यात बलात्कार, हत्या आणि विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुरेशीने कुर्ल्यातील नेहरुनगर येथे पोलिस वसाहतीमधील चिमुरडीची बलात्कार करून हत्या केल्याचे उघडकीस आले.

कोपरखैरणे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी अटकेत असलेल्या रेहान कुरेशीची नवी मुंबई पोलिसांनी संपूर्ण कुंडली बाहेर काढली. कुरेशीनेच कुर्ला येथील आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. विशेष पोलीस तपास पथक या प्रकरणी तपास करत असल्याने देशातील सर्वाधिक लैंगिक अत्याचाराचे गुन्हे करणार्‍या या नराधमाकडून हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. अत्याचार झालेल्या पालकांनी पुढाकार घेतल्यास आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisement -

त्याने सुमारे 18 गुन्हे केले आहेत. एकट्या-दुकट्या अल्पवयीन मुलींना गाठून वडिलांनी बोलवले आहे, असे सांगून हा त्यांना नराधम निर्जनस्थळी न्यायचा. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा. रेहान कुरेशीचे ज्या, ज्या ठिकाणी वास्तव्य होते, त्या परिसरात आता पोलीस अधिक माहिती घेत आहेत. कफ परेड, कुर्ला या ठिकाणी पोलिसांनी जाऊन तपास केल्यावर कुर्ल्यातील लहान मुलीवर अत्याचार करून रेहानने तिला ठार मारल्याचे उघडकीस आले. 2005 पासून अशा अनेक गुन्ह्यांचा तपास आता पोलीस करीत आहेत. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोक्सो, विनयभंग, बलात्कार, हत्या गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईमध्ये पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. भोईवाडा, ओशिवरा, गोरेगाव, नेहरुनगर पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -