घरमुंबईशेअर बाजारात दिवाळी; लक्ष्मी पावली

शेअर बाजारात दिवाळी; लक्ष्मी पावली

Subscribe

लक्ष्मीपूजनाच्या विशेष मुहूर्तावर शेअर बाजारात ३१० अंकांनी उसळी मारून ३५ हजार अंकांचा आकडा पार केला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीमध्येही तेजी पाहायला मिळाली.

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारातही आनंदाचे क्षण पाहायला मिळाले. आज, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या विशेष मुहूर्तावर शेअर बाजारात ३१० अंकांनी उसळी मारून ३५ हजार अंकांचा आकडा पार केला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीमध्येही तेजी पाहायला मिळाली. निफ्टीची सुरुवात ६१ अंकांवरून १०,५९१ अंकावर तर सेंसेक्स २४५.७७ आणि निफ्टी ६८.४० अंकांवर बंद झाला.


 तासाभरात शेअर बाजारात उच्चांक

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर जवळपास तासाभरात गुंतवणूक करणाऱ्यांना १.१८ लाख कोटींचा फायदा झाला. लक्ष्मीपूजचनाच्या मुहूर्तावर आज संध्याकाळी ५.३० ते ६.३० पर्यंत सुरू होता. आता शेअर बाजार गुरुवार, ८ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये सेंसेक्स ३१० अंकांनी वाढून ३५,३०१.९१ अंकावर पोहोचला. मंगळवारी हाच आकडा ४१ अंकांवर होता. मुंबईच्या शेअर बाजारात (BSE) मध्ये सर्वच उद्योजकांनी सरशी केल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई बाजारात हाँगकाँगमध्ये ०.१० टक्के तर तायवान शेअर बाजारात ०.८५ टक्के वाढ झाली. मात्र जपानमध्ये निक्की ०.८८ अंकांनी कोसळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -