घरमुंबईकल्याण पश्चिमेवर शिवसेनेचा डोळा; भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न!

कल्याण पश्चिमेवर शिवसेनेचा डोळा; भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न!

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात झाली आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ हा भाजपच्या वाटयाला असून, नरेंद्र पवार हे भाजपचे आमदार आहेत. मात्र या मतदार संघावर शिवसेनेने हक्क सांगितला आहे. युती होणार की नाही? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपची केांडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेला हा मतदार संघ न मिळाल्यास इतर पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा हा शिवसेनेचा गड म्हणूनच ओळखला जातो. २००९ ला मतदार संघाच्या विभाजनात कल्याण पश्चिम हा स्वतंत्र मतदार संघ झाला होता. त्यावेळी राज्यात मनसेची हवा असल्याने आणि परप्रांतिय विरोधातील आंदोलनाची ठिणगी कल्याणात पडली होती. त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले होते. मनसेचे प्रकाश भोईर हे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर लढले होते. तर भाजपचे मंगेश गायकर यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविली हेाती. यावेळी भोईर यांना ४१ हजार १११ मत मिळाली हेाती तर देवळेकर यांना ३५ हजार ५६२ मते तर गायकर यांना २२ हजार मते मिळाली. अवघ्या पाच हजार ५४९ मतांनी देवळेकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळी भाजपने बंडखोरी केली नसती तर शिवसेना विजयी होऊ शकली असती.

- Advertisement -

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढले. भाजप कडून ने माजी उपमहापौर नरेंद्र पवार तर शिवसेनेकडून शहर प्रमुख विजय साळवी हे मैदानात उतरले. पवार यांना ५४ हजार ३८८ मते तर साळवी यांना ५२ हजार १६९ मते मिळाली. काँग्रेसचे सचिन पोटे यांना २० हजार १६० मते मिळाली. शिवसेनेचा अवघ्या २ हजार २१९ मताने पराभव झाला होता. शिवसेना भाजपची युतीबाबत अजूनही निर्णय झालेला नाही मात्र २००९ च्या फॉम्र्युल्यानुसार कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेला मिळावी अशी सेनेची मागणी आहे. त्यासाठी सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे जोर लावला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी कल्याण पश्चिम शिवसेनेला मिळणार असेल तरच काम करू अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र त्यावेळी शिवसेनेचे नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांची समजूत काढून हा विषय शांत केला होता. मात्र जागा वाटपात कल्याण पश्चिम सेनेच्या वाटयाला आल्यास पालघरच्या गावित फॉम्युल्यानुसार आमदार नरेंद्र पवार हे खांदयावर भगवा झेंडा घेऊ शकतात अशीही भिती शिवसैनिकांमध्ये व्यक्त हेाताना दिसत आहे. त्यामुळे सेनेचे मनसुबे उधळू शकतात. मात्र सेनेच्या वाटयाला जागा न मिळाल्यास बंडखोरी करण्यापेक्षा इतर पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी सेनेेतील अनेकांनी चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेत कुणाचं कल्याण होतं हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -