घरमुंबई'डिस्ट्रिक्ट हाऊसिंग'च्या निवडणुकीत  शिवसेनेला भोपळा!

‘डिस्ट्रिक्ट हाऊसिंग’च्या निवडणुकीत  शिवसेनेला भोपळा!

Subscribe

गृहनिर्माणासाठी शिवसेनेने कोणतेही योगदान दिलेले नाही', असा आरोप भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी आपलं महानगरशी बोलताना केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेची केलेल्या डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत शिवसेनेच्या हाती चक्क भोपळा लागला आहे. शिवसेनेनेच नावारुपाला आणलेल्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेलाच पराभव पाहायला लागला आहे.  आमदार प्रवीण दरेकर आणि शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत रघुवीर सामंत पॅनेलने विजय मिळवला. भाजप पुरस्कृत या पॅनेलने शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनेलचा पराभव करत २१ उमेदवारांना विजयी केले. दादरच्या शिवाजी विद्यालयात ही निवडणुक पार पडली. विमान निशाणी असलेल्या शिवसेनेला या निवडणूकीमध्ये साधे खातेही उघडता आले नाही.


वाचा: बोफोर्सचा बाप राफेल – संजय राऊत

गृहनिर्माणासाठी सेनेचे योगदान नाही

दरम्यान ‘गृहनिर्माणासाठी शिवसेनेने कोणतेही योगदान दिलेले नाही’, असा आरोप भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी आपलं महानगरशी बोलताना केला. ‘उद्धव ठाकरे यांनी पत्रक काढले होते. बैठका घेऊन शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार यांना कामाला लावले होते. तसेच चांदीची नाणी देखील वाटल्याचे समोर आले होते. तरीही लोकांनी भाजपवर विश्वास ठेवून त्यांना या निवडणुकीत जिंकवून दिलं’, असं मत दरेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. मुंबईकरांचा, हाऊसिंग सोसायटीच्या प्रतिनिधींचा राज्याच्या मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी हाऊसिंगसाठी केलेल्या योगदानाची लोकांना कल्पना आहे. रघुवीर सामंत यांचे योगदानही लोकांच्या लक्षात आहे, असंही दरेकर म्हणाले.


वाचा : भिडेंवर सरकारची कृपादृष्टी, ६ गुन्हे घेतले मागे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -