घरमुंबईबोफोर्सचा बाप राफेल - संजय राऊत

बोफोर्सचा बाप राफेल – संजय राऊत

Subscribe

राफेल घोटाळ्याचं प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात धगधगतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते उद्योगपती अनिल अंबांनींपर्यंत अनेकांवर याप्रकरणी टीका करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राफेल घोटाळ्याप्रकरणी नुकतीच सरकारवर टीका केली आहे. ‘बोफोर्सचा बाप राफेल’ असं वक्तव्य करत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं ‘राफेल’ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही युतीसाठी तयार आहोत. मात्र, याविषयीचा निर्णय शिवसेनेने घ्यावा’, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतंच सांगितलं होतं. मात्र, शिवसेनेकडून सामनातून भाजपावर विविध मुद्यावर टीका होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे खरचं शिवसेना युती करणार का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच आता राफेल घोटळ्यावरून शिवसेनेने भाजापावर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.

काय म्हणालेत राऊत ?

बोफोर्स घोटाळ्यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या नातेवाईकांना ६५ कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा आरोप करणारेच आता सत्तेत आहेत. त्यांच्या राफेल जेट विमानांच्या व्यवहारात ७०० कोटी रुपये कुणाच्या खिशात गेले आहेत? त्यामुळेच राफेल घोटाळा हा बोफोर्स घोटाळ्याचा बाप आहे. ‘राफेल’वरुन फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारनेच रिलायन्सचे नाव सुचवल्याचे उघड केले आहे. आता हे ओलांद राहुल गांधींचे हस्तक किंवा देशद्रोही आहेत असे मानायचे का? असा सवालही खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

‘रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना या विमानांचे कंत्राट देण्यात आले होते या शंकाच नाही. मात्र, ५२६ कोटींचा खरेदी व्यवहार मोदी सरकारच्या काळात १ हजार ५७० कोटींवर गेलाच कसा? याचे स्पष्टीकरण सरकारने द्यायची गरज आहे. याचाच अर्थ या व्यवहारातील मधल्या व्यक्तीला प्रत्येक विमानामागे १००० कोटी रुपयांची दलाली मिळाली आहे’, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -