घरदेश-विदेश'एटीएम'मधून पैसे काढण्याची रक्कम निम्म्यानं कमी

‘एटीएम’मधून पैसे काढण्याची रक्कम निम्म्यानं कमी

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएममधून एकावेळी काढता येणाऱ्या रक्कमेची मर्यादा निम्म्यानं कमी करण्यात आली आहे. आता 'एसबीआय'च्या एटीएमधून एकावेळी फक्त २० हजार रुपये काढता येणार आहेत.

प्रत्येक बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची एक मर्यादा असते आणि प्रत्येक बँकेची ही मर्यादा वेगवेगळी असते. आता स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएममधून एकावेळी काढता येणाऱ्या रक्कमेची मर्यादा कमी करण्यात आली आहे. आतापर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या ‘एटीएममधून ४० हजार रक्कम काढता येत होती. मात्र आता ही रक्कम निम्म्यानं कमी करण्यात आली आहे. स्टेट बँकेच्या ‘एटीएम’मधून एकावेळी आणि दिवसभरात जास्तीत जास्त २० हजार रुपये काढता येणार आहे. ही मर्यादा ३१ ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘एसबीआय’ने का घेतला हा निर्णय?

देशभरात मोठ्या प्रमाणात अनेक ग्राहक एटीएमचा वापर करतात. पण त्यासोबतच एटीएमसंबंधित गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात एटीएम मशीनमधील वेगवेगळ्या शक्कल लढवून पैसे लंपास केले जातात. तर काही ग्राहकांच्या एटीएमचा पीन चोरुन किंवा त्यांना कोंडीत पकडून चोरटे मोठी रक्कम लंपास करतात. हे बँकेच्या निदर्शनास आल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

‘एटीएम’मधून काढल्या जाणाऱ्या रक्कमेवर अधिकाअधिक आळा बसावा. एटीएममधून पैसे काढण्याचे घोटाळे कमी व्हावे याकरता हा निर्णय घेतला आहे. यामुळे गुन्हे देखील कमी होऊन कॅशलेस व्यवहारांना चालना देखील मिळणार आहे.  – पी. एन. गुप्ता, स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक

वाचा – एसबीआयच्या ७० हजार कर्मचाऱ्यांना झटका

- Advertisement -

वाचा – तुमचं SBI मध्ये खातं आहे? मग हे वाचाच!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -