घरमुंबईजे. जे. रूग्णालयाला शिवसेना शिष्टमंडळाची भेट

जे. जे. रूग्णालयाला शिवसेना शिष्टमंडळाची भेट

Subscribe

भायखळा कारागृहातील महिला कैद्यांची चौकशी करण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने जे. जे. रूग्णालयाला भेट दिली. उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने बाधित कैद्यांना जे. जे. रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीची शिवसेना शिष्टमंडळाने चौकशी केली.

दोन दिवसापूर्वी मुंबईतील भायखळा सेंट्रल जेलमध्ये ८५ महिला कैदी आणि चार वर्षाच्या बाळाला विषबाधा झाल्यान त्यांना जे. जे. रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्व कैद्यांची चौकशी करण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने जे. जे. रूग्णालयाला भेट देत कैद्यांच्या तब्येतीची चौकशी केली. आमदार मनिषा कायंदे आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला शिष्टमंडळाने जे. जे. रूग्णालयामध्ये जाऊन कैद्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. क्वालरा होऊ नये यासाठी दिल्या गेलेल्या औषधामुळे तसेच दूषित पाणी प्यायल्याने कैद्यांना त्रास झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. मात्र यावर डॉक्टरांच्या रिपोर्ट अद्याप तरी आलेला नाही. दरम्यान, जेलसुविधेमध्ये आणखी सुधारणा होण्याची गरज असल्याचे मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संपूर्ण घेटनेच्या चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती आमदार मनिषा कायंदे यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

दोन दिवसापूर्वी भायखळा कारागृहातील महिला कैद्यांची प्रकृती अचानक बिघडली. जवळपास ८२ महिला कैद्यांना उपचारासाठी जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कैद्यांना अन्न आणि पाण्यातून विषबाधा झाली असा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवार सकाळपासून या महिला कैद्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कैद्यांवर जे. जे. रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे जे. जे. रूग्णालयाला छावणीचे रूप प्राप्त झाले असून या संपूर्ण प्रकरणाची पोलीस अधिक सखोलपणे चौकशी करत आहेत.

वाचा – भायखळा कारागृहातील ८२ महिला कैद्यांना विषबाधा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -