घरताज्या घडामोडीlata deenanath mangeshkar award: मुख्यमंत्र्यांचे नाव वगळणे हा मंगेशकर कुटुंबाच्या मनाचा कोतेपणा...

lata deenanath mangeshkar award: मुख्यमंत्र्यांचे नाव वगळणे हा मंगेशकर कुटुंबाच्या मनाचा कोतेपणा – शिवसेना

Subscribe

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी लतादीदींचा मोठी बहिण असा उल्लेख पंतप्रधानांनी केला. पण या कार्यक्रमाला मंगेशकर कुटुंबीयांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न बोलावल्यासाठी शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव न टाकून मंगेशकर कुटुंबाने मनाचा कोतेपणा दाखवला असल्याचे ट्विट शिवसेनेकडून करण्यात आले आहे. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याआधीच लता मंगेशकर यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथे जागेवरून वाद पेटला होता. त्यावेळी भाजपने ही मागणी जोरदारपणे धरत शिवाजी पार्कातच स्मारकाची मागणी केली होती. पण मंगेशकर कुटुंबाने स्मारकाला जागा नको आहे असे स्पष्टीकरण देत वाद संपवला होता. मुंबई विद्यापिठातील जागेत लता मंगेशकर यांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा मंत्रीमंडळ ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाने काही दिवसांपूर्वीच एकमताने संमत करण्यात आला होता.

मुंबईतील षण्मुखानंद येथे हा पुरस्कार स्विकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत शिष्टाचार विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी केले. पण मुख्यमंत्र्यांना आमंत्रित न करण्यात आल्याने या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली नाही. मुख्यमंत्री आज सायंकाळी ८० वर्षांच्या शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेटीला गेल्याचे दिसले. मातोश्रीसमोर ठिय्या मांडून बसलेल्या शिंदे यांच्या घरी ठाकरे कुटुंबाने भेट दिली. पण पंतप्रधान मुंबईत असतानाही मंगेशकर कुटुंबाने या कार्यक्रमात आमंत्रित न केल्याने त्यांनी या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली.

- Advertisement -

शिवसेनेची मंगेशकर कुटुंबावर टीका

लता दिदीवर मराठी माणसाने मराठी माणसाने भरभरून प्रेम केले. ठाकरे कुटूंब कायमच मंगेशकर कुटूंबाच्या पाठीशी राहिले, त्याच ठाकरे कुटुंबातील उध्दवठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव न टाकून मंगेशकर कुटुंबाने मनाचा कोतेपणा दाखवला आहे, अशा शब्दात टीका ही शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.

- Advertisement -

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमासाठी न बोलावल्याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री यांनीही ट्विट करत मंगेशकर कुटुंबीयांविरोधातील नाराजी मांडली आहे. आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे ट्विट केले आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे, अशा आशयाचे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -