घरताज्या घडामोडीKirit Somaiya: केंद्रीय गृह सचिवांच्या भेटीसाठी भाजपचे शिष्टमंडळ उद्या सोमवारी दिल्ली गाठणार

Kirit Somaiya: केंद्रीय गृह सचिवांच्या भेटीसाठी भाजपचे शिष्टमंडळ उद्या सोमवारी दिल्ली गाठणार

Subscribe

शनिवारी रात्री उशिरा खार पोलीस स्टेशन येथे किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आज सकाळी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हल्लाबोल केला. किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती ही केंद्रीय गृह सचिवांनाही दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबतची परिस्थिती सांगण्यासाठी भाजपचे एक शिष्टमंडळ उद्या सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार आहे. केंद्र सरकारचे गृह सचिव अजय भल्ला यांनी उद्या सकाळी या शिष्टमंडळाला भेट देण्याचे निश्चित केले आहे.

किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या मदतीने ठाकरे सरकारने त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. मुंबई पोलीस आयुक्तांच्या कालावधीत मनमानी पद्धतीने कारभार करण्यासाठीच त्यांना पोस्टिंग दिल्याचाही आरोप केला होता. मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणासाठी राणा दांपत्याने आव्हान दिल्यानंतर त्यांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या दांपत्याच्या भेटीला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकातून बाहेर पडताना हल्ला झाला. त्यामुळेच किरीट सोमय्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या निमित्ताने ठाकरे सरकारला यासाठी जबाबदार ठरवले होते.

- Advertisement -

किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या खार येथील हल्ल्यासाठी उद्या २५ एप्रिल सकाळी १०.१५ वाजता मुंबई भाजपा चे शिष्टमंडळ आ. सुनील राणे , आ. मिहिर कोटेचा, आ. अमित साटम, आ. पराग शाह आणि भाजपा महापालिका नेते विनोद मिश्रा आणि किरीट सोमैया स्वतः हे केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार आहेत. नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव अजय भल्ला यांना किरीट सोमैया यांना शिवसेनेच्या गुंडांनी केलेल्या मारहाण प्रकरणाच्या मुद्द्यावर भेटणार आहेत.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -