घरमुंबईमध्य रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड; प्रवासी त्रस्त

मध्य रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड; प्रवासी त्रस्त

Subscribe

मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. ही वाहतूक पूर्वपदावर लवकर येईल, अशी आशा प्रवाशांना आहे.

मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अनेक गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. या बिघाडामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. कडाक्याचे उन, गरमी आणि त्यात गाड्या उशिराने धावत आहेत, त्यामुळे प्रवाशी प्रचंड वैतागले आहेत. यावर कुणी रेल्वे प्रशासनाच्या गलथानपनावर रोष व्यक्त करत आहे तर कुणी कामावर जायला उशिर होईल म्हणून नाराजी व्यक्त करत आहे.

तांत्रिक बिघाड दुरुस्त

मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के जैन यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक पूर्वपदावर येईल, अशी आशा प्रवाशांना आहे.

- Advertisement -

दोन दिवसांत वारंवार वाहतूक विस्कळीत

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्ग विस्कळीत होण्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रगती एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. यामुळे मुंबईच्या दिशेने साधारणत: २०० गाड्या खोळंबवल्या होत्या. त्याच दिवशी संध्याकाळी रेल्वे सुळावरुन एका गाडीचे चाक उतरले होते. त्यामुळे देखील वाहतूक विस्कळीत झाली होती. आज पुन्हा वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या वाहतूक विस्कळीततेचे ग्रहन केव्हा नाहीसं होईल, हा मोठा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -