घरताज्या घडामोडीसिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी पुण्यातून पत्रकाराला अटक

सिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी पुण्यातून पत्रकाराला अटक

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी पुण्यातील एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत सूर्यवंशी असे या पत्रकाराचे नाव आहे. मुंबई गावदेवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

एएनआयएने हे वृत्त दिले आहे. त्यानुसार सिल्वर ओकवरील हल्ला प्रकरणी सध्या अटकेत असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या चौकशीतून काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी ११५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील १०९ जणांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपासात या हल्ल्याचे आणि सदावर्तेंचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. यासंबंधी ज्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे त्याला चौकशीनंतर मुंबईत नेण्यात आले आहे. तो भारती विद्यापीठ पोलीस हद्दीतील आंबेगाव पठार येथे लपून बसला होता. त्याचे MJT नावाचे यूट्यूब चॅनल आहे. त्याने सिल्वर ओकची रेकी केल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिलला शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी चपलफेक आणि दगडफेक करत हल्ला केला होता. याघटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमेतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -