घरमुंबईमुंबईत पाणीसाठ्याची मोठी क्षमता

मुंबईत पाणीसाठ्याची मोठी क्षमता

Subscribe

सिंगापूर पॅटर्नने मुंबईला पाणी नियोजन शक्य

मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरीही हे सगळे पाणी समुद्रालाच जाते. सद्यस्थितीत हे पाणी साठवण्यासाठी मुंबईकडे कोणतीही यंत्रणा नाही. म्हणूनच मुंबईने सिंगापूर पॅटर्नचा वापर हा पाण्याच्या साठवणणुकीसाठी करायला हवा. वाढत्या लोकसंख्येनुसार मुंबईला पाण्याच्या अतिरिक्त गरजेसाठी अशा पर्यायांचा शोध घ्यावाच लागेल, असे मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) ने मुंबईत आयोजित केलेल्या वॉटर कॉनक्लेव्हच्या पार्श्वभूमीवर ते ‘आपलं महानगर’शी बोलत होते.

सिंगापुरमध्ये जमिनीखाली पाण्याच्या स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आता सिंगापूरमध्ये साठवण्यात आलेले पाणी इतर शहरांमध्ये देणे शक्य होत आहे. मुंबईनेही शहरातील काही ठिकाणी अशी व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबईची वाढती पाण्याची गरज भागतानाच पाण्यासाठी नवीन स्त्रोतही निर्माण होईल, असे ते म्हणाले. मुंबईत अशा पाण्याच्या स्टोरेजसाठी कोणत्या जागा आहेत ? भूगर्भात कोणत्या ठिकाणी पाण्याचे स्टोरेज करता येईल अशा जागांचा शोध घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईलाही नजिकच्या शहरांना पाणी पुरवता येईल, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

- Advertisement -

आपल्या शालेय शिक्षणातच आपल्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला जाणे गरजेचे आहे. कोल्हापूर, सांगतील आलेला पूर हा पहिल्यांदा आलेला नाही. पुरासाठीची याआधीची कारणे वेगवेगळी आहेत. प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीनुसार कोणत्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट व्हायचे आहे, हे शालेय शिक्षणातूनच शिकवले जाणे गरजेच आहे. त्यासाठी वातावरणातील बदलांचा अभ्यास केला जाणे आवश्यक आहे. अतिशय मायक्रो लेव्हेलला अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीचा अभ्यास व्हायला हवा. बदलत्या पॅटर्ननुसारच आपल्या भागात नियोजन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -