घरमुंबईसायन उड्डाण पूल दुरुस्तीसाठी ३ महिने राहणार बंद

सायन उड्डाण पूल दुरुस्तीसाठी ३ महिने राहणार बंद

Subscribe

येत्या १ डिसेंबरपासून पुढील तीन महिन्यांसाठी सायन उड्डाणपूल बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

१ डिसेंबरपासून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईतील सायन उड्डाणपूल वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून पुढील तीन महिन्यांसाठी हा पूल बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. सायनचा उड्डाणपूल २५ वर्ष जुना असून या पुलांवरील दुर्घटनांमुळे या उड्डाणपुलाची दूरुस्ती करण्यात येणार आहे.

सायन उड्डाणपूल वाहतूकीसाठी बंद होणार असल्याने सायनहून दादर आणि सीएटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणा आहे. सायन पुलाखाली मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुलाच्या दुरुस्तीचं कमा हाती घेण्यात येणार आहे. .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -