घरमुंबईठाणे आयुक्तांचे नवे आदेश, होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ठाणे आयुक्तांचे नवे आदेश, होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Subscribe

ठाणे शहरामध्ये वाढत्या अनधिकृत होर्डिंग्जच्या समस्येवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कठोर भूमिका घेतली असून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही सणादरम्यान रस्त्यांवर राजकीय पक्षांचे, दुकानदारांचे होर्डिंग्ज लागलेले आपण अनेकदा पाहातो. परवानगी नसताना देखील हे होर्डिंग लावले जातात. मात्र, आता ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशा अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीमध्ये महापालिकेची परवानगी न घेताच अनधिकृतपणे होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याचे आदेशच संजीव जयस्वाल यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. दरम्यान, अतिक्रमणासाठी दंडाचे शुल्क वसूल करण्याबाबत कोणतीही हयगय चालणार नाही, असे कडक निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

न्यायालयीन अवमान याचिका दाखल होणार

ठाणे शहरामध्ये सणासुदीच्या काळात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज लावल्यामुळे रस्ते विद्रूप होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. यासंदर्भात पालिकेकडे अनेक वेळा तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. पालिकेकडून कारवाई झाल्यानंतरही अशा प्रकारचे होर्डिंग्स कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे अखेर आयुक्तांनी अशा होर्डिंग्जविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शहरामध्ये दिवाळीच्या कालावधीत अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याबरोबरच त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्याचे आदेश जयस्वाल यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ठाणे मनपाच्या आडमुठेपणामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात


अतिक्रमण विभागाला विशेष आदेश

दरम्यान, अतिक्रमण निष्कासन फी वसुली करण्याबाबत अतिक्रमण विभागाला आदेश देतानाच ज्यांची निवासी घरे किंवा व्यावसायिक आस्थापना तोडल्या असतील, त्यांची यादी तपासून त्यांच्याकडून किती निष्कासन फी वसूल करावी? याचे धोरण ठरविण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याबाबत समाज विकास विभागाकडून करण्यात आलेले बायोमेट्रिक्स तसेच स्थावर मालमत्ता विभागाकडून रेंटल हाऊसिंगमध्ये घर देण्यात आलेल्या लोकांची यादी तपासून खातरजमा करण्यात यावी असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले. सदर यादी कोणत्याही परिस्थितीत एका आठवड्यात बनविण्यात यावी आणि त्यानंतर वसुलीची कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -